Recipe : फ्रिजमध्ये काय ठेवलं आहे, त्यावरून ChatGPT सांगणार कोणती रेसिपी बनवायची
- Published by:Priya Lad
Last Updated:
ChatGPT Recipe : फ्रिजमध्ये काय ठेवलं आहे, त्यावरून चॅटजीपीटी कोणती रेसिपी बनवायची ते सांगणार. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
बऱ्याचदा आपलं फ्रिज वस्तूंनी भरलेलं असतं. तर काही वेळा काही मोजक्याच वस्तू असतात. भरपूर वस्तू असतो वा कमी असोत. एक प्रश्न कायम पडतो की काय बनवायचं? कोणती रेसिपी बनवू. पण आता तुमच्या या समस्येचं निराकारण AI करू शकतो. फ्रिजमध्ये काय ठेवलं आहे, त्यावरून चॅटजीपीटी कोणती रेसिपी बनवायची ते सांगणार. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चॅटजीपीटी तुमचा फ्रिज उघडत नाही, तुमचा डेटा बघत नाही, फक्त तुम्ही सांगितलेल्या माहितीवर विचार करतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचाराचा आहे की, माझ्या फ्रिजमध्ये फक्त बटाटा, कांदा आणि दही आहे. 10 मिनिटात काय बनवू? किंवा अंडी नाहीत, गॅस कमी आहे, झटपट नाश्ता सुचवा. जर तुम्ही फ्रिज किंवा भाजीचा फोटो दिलात तर AI फोटो ओळखूनही रेसिपी सुचवू शकतो जसं हे बटाटे आहेत, यापासून काय होईल? यावर तुम्हाला चॅटजीपीटी मदत करेल.









