Chikhaldara Election : फडणवीसांनी भावाला बिनविरोध निवडून आणलं, पण काँग्रेसने फिरवला गेम! शेवटच्या क्षणी अख्खं पॅनेल लागलं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Chikhaldara Fadnavis brother Win unopposed : चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते.
Chikhaldara Municipal Council Election Result : मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे चर्चेत आलेल्या चिखलदरा नगरपरिषदेमध्ये (Chikhaldara Municipal Council) धक्कादायक निकाल हाती आला आहे. चिखलदऱ्यात 20 जागेपैकी 12 जागांवर काँग्रेसने विजयी मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे ही निवडणूक गाजली होती. पण काँग्रेसने या निवडणुकीत बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील यांनी माघार घेतली होती.
देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती
चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कलोती कुटुंबीयांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आल्हाद कलोती यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.
advertisement
बिनविरोध विजयी घोषित
काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील यांनी माघार घेतल्याने आल्हाद कलोती यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं होतं. अशातच भाजपला मात्र गड राखता आला नाही. चिखलदऱ्याच्या विकासाला प्राधान्य देऊन रखडलेली विविध विकास कामं, पाणी पुरवठा समस्या आणी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचा मानस आल्हाद कलोती यांनी व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chikhaldara Election : फडणवीसांनी भावाला बिनविरोध निवडून आणलं, पण काँग्रेसने फिरवला गेम! शेवटच्या क्षणी अख्खं पॅनेल लागलं










