दारूच्या अड्ड्यावर मृत्यूचे तांडव, टवर्नमध्ये घुसून अंधाधुंद गोळीबार; 10 जणांचा जागेवर मृत्यू, थरारक सामूहिक हत्याकांड

Last Updated:

Mass Shooting In South Africa: जोहान्सबर्गजवळील बेकर्सडाल टाउनशिपमध्ये रविवारी रात्री झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका बेकायदेशीर टवर्नमध्ये घुसून अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18
News18
जोहान्सबर्ग: रविवारी जोहान्सबर्गच्या पश्चिमेला असलेल्या बेकर्सडाल (Bekkersdal) टाउनशिपमध्ये झालेल्या भीषण सामूहिक गोळीबारात किमान दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक एका टवर्नमध्ये (दारूच्या अड्ड्यावर) घुसखोरी करत तेथे जमलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
बेकर्सडाल हे ठिकाण जोहान्सबर्गपासून सुमारे ४० किलोमीटर नैऋत्य दिशेला आहे. हल्ल्यानंतर बंदूकधारी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी पलायन केल्यामुळे घटनास्थळी अनेक जण मृतावस्थेत तर काही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. तातडीच्या वैद्यकीय सेवांनी जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गौतेंग प्रांताच्या पोलिस प्रवक्त्या ब्रिगेडियर ब्रेंडा मुरिडिली यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत आणि जखमी व्यक्तींची ओळख किंवा तपशील सध्या उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
ही घटना बेकर्सडालमधील एका बेकायदेशीर टवर्नजवळ घडली. हा परिसर आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून, तो अनेक मोठ्या सोन्याच्या खाणींच्या आसपास वसलेला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असला तरी, अद्याप कोणत्याही संशयिताची ओळख पटलेली नाही किंवा हल्ल्यामागील हेतू उघडकीस आलेला नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/विदेश/
दारूच्या अड्ड्यावर मृत्यूचे तांडव, टवर्नमध्ये घुसून अंधाधुंद गोळीबार; 10 जणांचा जागेवर मृत्यू, थरारक सामूहिक हत्याकांड
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde Faction: राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंचा गेम
राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच
  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

View All
advertisement