Nagpur Crime : मॅटर जूना पण कांड नवं! ट्रकच्या पानाने डोक्याचा केला चेंदामेंदा, नागपूरमधील भयंकर घटना

Last Updated:

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत दोन तरूणांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.त्यानंतर हे भांडण इतक्या टोकाला गेले की एकाने ट्रकचा पाना काढून दुसऱ्यावर तरूणावर वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.

nagpur crime news
nagpur crime news
Nagpur Crime News : वृषभ फरकुंडे,प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत दोन तरूणांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.त्यानंतर हे भांडण इतक्या टोकाला गेले की एकाने ट्रकचा पाना काढून दुसऱ्यावर तरूणावर वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. विवेक तांडेकर असे या घटनेतील मृताचे नाव आहे. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी गावालगतच्या वीटभट्टीजवळ ही घटना घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मृत विवेक आणि देवा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून गावातील वर्चस्वावरून वाद सुरू होता.हा वाद सूरू असतानाच रात्री सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. हे भांडण इतक्या टोकाला पोहोचले की दोघे जण एकमेंकांच्या जीवावर उठले.यावेळी रागाच्या भरात देवा वंजारीने पाना आणि ट्रकचे चाक उघडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजाराने विवेकर जोरदार वार केले होते. या हल्ल्यात विवेक गंभीररीत्या जखमी झाला होता.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ विवेकला रुग्णालयात दाखलं केलं होतं.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.या घटनेनंतर जुनी कामठी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित देवा वंजारी याला अटक करण्यात आली आहे.
विवेक तांडेकर आणि देवा वंजारी यांच्यात जुन्या वैमनस्य होते.या वैमनस्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती आहे.या घटनेनंतर तांडेकर कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सूरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Crime : मॅटर जूना पण कांड नवं! ट्रकच्या पानाने डोक्याचा केला चेंदामेंदा, नागपूरमधील भयंकर घटना
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement