लग्न जुळवताना अष्ट कुट मिलन महत्त्वाचे, जाणून घ्या किती गुण जुळणे महत्त्वाचे?
जाणून घ्या, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात वानर दिसण्याचा शुभ आणि अशुभ अर्थ. हसणारे वानर दिसले तर जर एखाद्याला स्वप्नात वानर हसताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की चांगला काळ सुरू होणार आहे. अशा स्थितीत आर्थिक लाभासोबतच समाजात व्यक्तीचा सन्मान वाढतो. कळपातील वानर दिसणे स्वप्नशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वानरांचा कळप दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला लवकरच आर्थिक लाभ होईल. यासोबतच कुटुंबात सुख-शांती नांदते राहील.
advertisement
सुख-शांतीसाठी वास्तुनुसार लावा हे रोप, संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग होईल खुला
वानरांचे भांडण जर तुम्हाला स्वप्न पडले की वानरे आपसात भांडत आहेत, तर याचा अर्थ असा आहे की काही कारणास्तव कुटुंबात तेढ होऊ शकते. वानर अन्न चोरताना दिसणे स्वप्नात वानर अन्न चोरताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला लवकरच धनप्राप्ती होणार आहे. वानर पोहताना पाहणे जर स्वप्नात वानर पोहताना दिसले, तर याचा अर्थ लवकरच तुमची अनेक समस्यांपासून सुटका होणार आहे. वानराने चावा घेणे जर तुम्हाला स्वप्न पडले की वानराने तुम्हाला चावा घेतला आहे, तर समजून घ्या की भविष्यात काही गंभीर दुखापत होणार आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)