आयोध्येत 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर ही आयोध्येतील पहिली रामनवमी आहे. शास्त्रज्ञांनी मंगळवारी या प्रणालीची चाचणी केली. या प्रोजेक्टचं नाव 'सूर्य तिलक प्रोजेक्ट' आहे. काउंन्सिल ऑफ सायंटिस्ट अँड इंडस्ट्रीअल रिसर्च (सीएसआयआर) - सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्युट (सीबीआरआय) रुरकीतील शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पाणिग्रही म्हणाले की, रामनवमीला श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर टिळा लावणं हा सूर्य तिलक प्रोजेक्टचा मूळ उद्देश आहे. या अंतर्गत दुपारी रामाच्या कपाळावर सूर्यप्रकाश पाडला जाईल.
advertisement
डॉ. पाणिग्रही म्हणाले, ‘या प्रोजेक्टअंतर्गत दरवर्षी चैत्र महिन्यात रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून रामाच्या कपाळावर सूर्यप्रकाशाचा टिळा लावला जाईल. दरवर्षी या दिवशी सूर्याची आकाशातील स्थिती बदलते. तपशीलवार गणनातून असं निदर्शनास येतं की, दर 19 वर्षांनी रामनवमीच्या तारखेची पुनरावृत्ती होते. सीएसआयआर-सीबीआरआय रुरकी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, नियोजित टिळ्याचा आकार 58 मिमी आहे.’ त्यांनी सांगितलं की, टिळा लावण्याचा योग्य कालावधी सुमारे तीन ते साडेतीन मिनिटांचा आहे. ज्यापैकी दोन मिनिटे कपाळावर पूर्ण सूर्यप्रकाश असेल.
राम नवमी दिवशी चुकूनही करू नयेत या 4 गोष्टी; कुटुंबाच्या प्रगतीवर होईल परिणाम
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले, ‘सूर्य तिलक समारोहाच्या काळात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. हा विहंगम सोहळा दाखवण्यासाठी मंदिर ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात सुमारे 150 एलईडी टीव्ही बसवण्यात येत आहेत. सीएसआयआर-सीबीआरआय रुरकी येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डी. पी. कानुनगो म्हणाले, ‘हा प्रोजक्ट आमच्या वैज्ञानिक कौशल्याचा आणि स्वदेशी तांत्रिक विकासाचा एक पुरावा ठरेल. आकाश ढगाळ असेल तर ती नैसर्गिक मर्यादा आहे. कृत्रिम प्रकाशाद्वारे प्रकल्प पूर्ण करून भाविकांच्या श्रद्धेची चेष्टा आम्ही करणार नाही.’
जय जय श्रीराम..! आज राम नवमी, रवि योगात पूजा, पहा विधी, मंत्र आणि शुभ मुहूर्त
सीएसआयआर-सीबीआरआय रुरकी येथील टीमने बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सशी सल्लामसलत करून मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून गर्भगृहापर्यंत सूर्यप्रकाश प्रसारित करण्याची यंत्रणा विकसित केली आहे आणि त्याच्या वारंवार चाचण्या केल्या आहेत असं डॉ. पाणिग्रही यांनी सांगितलं.
ऑप्टो-मेकॅनिकल सिस्टीमबद्दल अधिक माहिती देताना डॉ. पाणिग्रही म्हणाले, ‘ऑप्टो-मेकॅनिकल सिस्टीममध्ये चार आरसे आणि चार लेन्स असतात. ते टिल्टिंग तंत्र आणि पायपिंग सिस्टीममध्ये बसवलेले असतात. आरसे आणि लेन्सद्वारे सूर्यकिरण गर्भगृहाकडे वळवण्यासाठी टिल्टिंग मेकॅनिझमसाठी अॅपर्चर असलेलं संपूर्ण आवरण मंदिराच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आलं आहे. शेवटची लेन्स आणि आरसा पूर्वेकडे तोंड असलेल्या श्रीरामाच्या कपाळावर सूर्यकिरण केंद्रीत करतील.’