प्रसिद्ध कणकणेश्वर मंदिर
जालना शहरातील हिरालाल शेंडीवाले हे पुजारी वयाच्या अवघ्या दहा वर्षापासून कणकणेश्वर महादेव मंदिरात आराधना करतात. ते जालना शहरात ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. पण कणकणेश्वर महादेवावर त्यांची लहानपणापासूनच निस्सीम श्रद्धा आहे. तेच या मंदिराची देखरेख करतात. श्रावण महिन्यामध्ये इथे भाविकांची गर्दी असते. दर सोमवारी इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. सध्या इथे गर्दी कमी असली तरी सकाळी तीन वाजल्यापासून दर्शनासाठी लोक येण्यास सुरुवात होते.
advertisement
दुष्काळात सुरू केली गोशाळा, जालन्यातील कुटुंबाची अनोखी गोसेवा
काय आहे आख्यायिका?
सगळ्यात सुरुवातीला महादेवाची ही मूर्ती पाण्याच्या वाहणाऱ्या झऱ्यामध्ये होती. तयार असलेली मूर्ती पाण्यामुळे वाहून गेली की नवीन मूर्ती आपोआप तयार व्हायची. कित्येक वर्ष मी इथे झोपलो. राहिलो. वाळूपासून नेहमी मूर्ती तयार होत असल्याने याला वाळूचा महादेव असं म्हटलं जातं. आजही या महादेवाची मूर्ती ही वाळूपासून तयार करण्यात आलेली आहे. तर दुसरी मूर्ती ही स्थापन करण्यात आलेली आहे, असं शेंडीवाले सांगतात.
सागवानी लाकडापासून बनलेल्या देवघराची करायचीय खरेदी? ‘इथं’ 1 हजारांपासून आकर्षक पर्याय उपलब्ध
भाविकांची गर्दी
कणकणेश्वर महादेव मंदिरात महादेवाची स्वयंभू मूर्ती आहे. इथं जे मागेल ते प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे जालना शहरातील हजार ते दीड हजार लोक दररोज या ठिकाणी दर्शन घेतात. निसर्गाच्या सानिध्यात मंदिर असल्याने अनेक लोक फिरण्यासाठी इकडे येतात आणि महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत, असंही शेंडीवाले सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





