नागपूरकर भोसले काळातील मंदिर
नागपूरची नगरदेवी आग्याराम मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. गोंड, नागपुरकर रघुजी महाराज यांच्या काळातही हे श्रद्धास्थान होतं. मंदिरातील मूर्ती ही मंदिराच्या मागील भागात खोदकाम करत असताना सापडली. नंतर त्याजागी देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले, असं सांगितलं जातं. मंदिरातील प्रभावळ आणि देवीवरील दागिने हे चांदीचे असून त्यात देवी अतिशय विलोभनीय दिसते. नागपूरमधील फार पुरातन मंदिर असल्याने या ठिकाणी लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी होत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सुरेश तिवारी यांनी दिली.
advertisement
हजार किलोमीटरवरून आणली माती, नागपुरात बंगाली कलाकार घडवतात दुर्गा मूर्ती, Video
कसं आहे आग्याराम देवी मंदिर?
मंदिर परिसर हा आठ एकर जागेत पसरलेला असून पूर्वी या भागात फार मोठे जंगल होते. तेव्हा या मंदिराची देखभाल कोठारी परिवार करत होता. मंदिराचा ताबा त्यांच्याकडे होता. कालांतराने मंदिर सर्वांसाठी खुले असावे यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली आणि मंदिराचा विस्तार झाला. सन 2000 पासून ट्रस्ट निर्माण झाले. मंदिराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मंदिरातील गाभारा प्रभावळ ही पूर्णतः चांदीची आहे.
..तेव्हा गाढवासारखं ओरडायची देवी, विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी माता माहितीये का? Video
मनोकामना ज्योत पाहण्यासाठी गर्दी
दरवर्षी नवरात्र निमित्त मनोकामना ज्योत प्रज्वलन केली जाते. त्यासाठी मोठा हॉल निर्माण करण्यात आला आहे. या हॉलमध्ये तीन ते चार हजार अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केल्या जातात. यंदा या ज्योत प्रज्वलित करण्यासाठी परदेशातून नावे आली आहेत. मंदिर सकाळी 4 वाजता सर्वांसाठी खुले होत असून साडेपाच वाजता आरती केली जाते. दिवसभर मंदिर खुले असून रात्री 12 ते 1 दरम्यान केवळ साफसफाई करता बंद केले जाते. एक तास वगळता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंदिर 23 तास खुले असते, अशी माहिती सुरेश तिवारी यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)