सातारा: मराठ्यांची राजधानी आणि ऐतिहासिक जिल्हा म्हणून साताऱ्याचं महत्त्व आहे. राजगड, रायगड, जिंजी यानंतर मराठ्यांची राजधानी अंजिक्यतारा येथे होती. याच अजिंक्यताऱ्याच्या शेजारी सह्याद्रीच्या डोंगररांगात सज्जनगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीमुळे या किल्ल्याला वेगळं महत्त्व आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. याबाबत समर्थ रामदास स्वामी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक तुषार पाठक यांनी दिली.
advertisement
सज्जनगडाचा इतिहास
सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यात समुद्रसपाटीपासून 3350 फूट उंचीवर सज्जनगड हा किल्ला आहे. साताऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यासाठी 200 ते 300 पायऱ्या चढून जावे लागते. प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज दुसरा याने 11 व्या शतकात केली. 2 एप्रिल 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला.
अग्निदिव्यातून धावले शेकडो नवसकरी, या देवाच्या विवाह सोहळ्यास भक्तांची मांदियाळी
समर्थ रामदास गडावर वास्तव्यास
शिवकाळातच समर्थ रामदास स्वामी या गडावर वास्तव्यास आले. आयुष्यातील शेवटची सहा वर्षे त्यांचं वास्तव्य याच गडावर होतं. याच काळात किल्ल्याला सज्जनगड म्हणून ओळखलं जावू लागलं. या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजही सज्जनगडावर येत असत. याबाबत पुरावा सज्जनगड येथील देवस्थान ट्रस्टकडे असल्याचे रामदास स्वामी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक तुषार पाठक यांनी दिली.
पहिल्या महायुद्धात सांडलं होतं सातारकरांचं रक्त, 278 वीरांचं हे स्मारक देतंय साक्ष
संभाजीराजेंनी केलं बांधकाम
सज्जनगड येथील मंदिराचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराज यांनी केला आहे. हे बांधकाम समर्थ रामदास स्वामी यांचा देह ठेवल्यानंतर करण्यात आले. या मंदिरावर अनेक राजशिल्प देखील लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे मंदिर समर्थांच्या स्मरणार्थ बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात 1682 मध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 22 जानेवारी 1682 मध्ये रामदास स्वामींनी सज्जनगडवर देह ठेवला. त्याच जागेवर समाधीच्या वर या राम, सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत, असं पाठक सांगतात.
दरम्यान, समर्थ रामदास स्वामी यांची समाधी असल्याने सज्जनगड येथे अनेक भक्त आणि शिवप्रेमी हजेरी लावत असतात.