ऐतिहासिक शिवमंदिर
छत्रपती संभाजीनगरमध्ये खडकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे. या शहराचं नाव सातवाहन काळात राजतडाग होतं. नंतर ते खडकी झालं. त्यावरून महादेवाच्या मंदिराला खडकेश्वर हे नाव पडलं. हे मंदिर सातवाहनांच्या नंतरचं असण्याची शक्यता आहे. मलिक अंबरच्या काळात हे मंदिर असल्याचे उल्लेख आहेत. पुढे 18 व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा उल्लेख सापडतो. छत्रपती संबाजीनगर शहराची ग्रामदेवता म्हणूनच या मंदिराला ओळखलं जातं, असे पुजारी सांगतात.
advertisement
कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर, ब्रिटिश काळात काय घडलं? Video
सन 2000 मध्ये झाला जीर्णोद्धार
अहिल्याबाई होळकर यांच्यानंतर पुन्हा एकदा ट्रस्टी मंडळींनी खडकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1998 ला नव्या स्वरूपामध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. ते बांधकाम 2000 पर्यंत पूर्णत्वास गेले. मंदिरामध्ये महादेवाची स्वयंभू पिंड असून ती काळा पाषाण पासून बनलेली आहे. या मंदिरातील महादेवाचे वैशिष्ट्य म्हणजे भगवान शंकरांबरोबर भगवान विष्णू सुद्धा विराजमान आहेत. मंदिरामध्ये शिवरात्र, श्रावण सोमवारी महादेवाचा शृंगार केला जातो आणि महापूजा केली जाते.
देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी?
कधी सुरू असतं मंदिर?
खडकेश्वर मंदिर सकाळी सहाला उघडतं आणि दुपारी एक वाजेपर्यंत चालू असतं. तर सायंकाळी 4 ला उघडून रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर सुरू असतात. रोज सकाळी व संध्याकाळी मंदिरामध्ये आरती केली जाते. दर्शन घेण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. नवसाला पावणारा महादेव म्हणून सुद्धा या मंदिराची ख्याती आहे, असे पुजारी चौधरी यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)





