कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर, ब्रिटिश काळात काय घडलं? Video

Last Updated:

वर्धा येथे ब्रिटिशकालीन मदादेव मंदिर आहे. कोकणातील एका अधिकाऱ्यानं हे मंदिर का बांधलं?

+
कोकणातील

कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर, ब्रिटिश काळात काय घडलं? Video

वर्धा, 23 ऑगस्ट: सध्या सुरू असणाऱ्या श्रावण महिन्यात विविध ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. वर्धा शहरात ब्रिटिशकालीन महादेव मंदिर असून ते वर्धेकरांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त गर्दी करतात. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतरही महत्त्वाच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. या शिवमंदिराच्या निर्मितीची कथा खास असून मंदिराचे सचिव सुधीर दंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महादेव मंदिराचा इतिहास
खरंतर वर्धाला पूर्वीचे नाव पालकवाडी होतं. तेव्हाच्या काळातील पालकवाडी मध्ये महादेवाचे मंदिरच नव्हतं. ब्रिटिश काळात एक बेदूरकर नावाचे अधिकारी वर्धात बदली होऊन आले होते. ते मूळचे कोकणाचे आणि त्यांची पत्नी शिवभक्त होती. त्यांनी बघितलं तर वर्ध्यात शिवशंकराचं एकही मंदिर नव्हतं. त्यामुळे त्यांनी शासनाकडून जागा मागितली आणि वर्धा शहरातील निर्जन अशा जागेवर मंदिर उभं झालं. त्यात विशेष असं की मंदिर बांधत असताना खोदकाम सुरू असताना स्वयंभू शिवलिंग तिथे सापडलं आणि त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात येते.
advertisement
12 ज्योतिर्लिंगाचे मंदिरात दर्शन
मंदिरात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची भक्तांकडून श्रद्धेने पूजा केली जाते. एका मोठ्या औदुंबराच्या झाडाच्या सभोवताली ज्योतिर्लिंगे प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहेत. या शिवलिंगाचे पूजन भक्तांकडून करण्यात येते. एका पाठोपाठ एक झाडाच्या भोवताली प्रतिष्ठापित असलेले हे शिवलिंग बघितल्यावर मनाला शांतीच मिळते. सर्व भक्त या ठिकाणी बेलफूल वाहून प्रार्थना करतात.
advertisement
मंदिरात वर्षभर चालतात कार्यक्रम
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे कावड यात्रा आयोजित केली जाते. पवनारच्या धाम नदीपात्रातील पाणी आणले जाते आणि त्या पाण्याने या स्वयंभू शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. श्रावण मासात महिनाभर येथे भक्तांची मांदियाळी दिसून येते. या पुरातन मंदिरात 2022 पर्यंत आणखी चांगला विकास दिसून आला. मंदिरात नवीन देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.
advertisement
हेमाडपंथी मंदिर इतिहासाचे देतंय साक्ष
मंदिरात 250 किलोचे पितळचे त्रिशूळ लावले गेले. हॉलचे बांधकाम 4 हजार चौरस फूट करण्यात आले आहे. त्याच प्रकारे याठिकाणी, लसीकरण, पोलिओ कॅम्प, विनामूल्य रोगनिदान शिबिर आदी कार्यक्रम मंदिर प्रशासनाद्वारे चालविले जातात. अशाप्रकारे आजही अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जा स्थान असलेलं हे महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर वर्धाच्या इतिहासाची साक्ष देतंय.
मराठी बातम्या/Temples/
कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर, ब्रिटिश काळात काय घडलं? Video
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement