देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी?

Last Updated:

रक्षाबंधन दिवशी देवांनाही राखी बांधली जाते. पण कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? इथं पाहा.

+
देवाला

देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी?

वर्धा, 25 ऑगस्ट: बहीण भावाचे सुंदर व प्रेमळ नाते दर्शविणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. रक्षा म्हणजे रक्षण करणारा व बंधन म्हणजे एक प्रकारचा संस्कृतीचा धागा होय. भावासोबतच राखी देवतांना देखील बांधली जाते. तसेच काही वस्तूंनाही राखी बांधली जाते. कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? कोणत्या वस्तूंना राखी बांधावी? यबाबत वर्धा येथील पद्माकर पेठकर महाराज यांनी माहिती दिली आहे.
कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी?
रक्षाबंधन सणाच्या दिवशी आपण देवांनाही राखी बांधतो. तर या दिवशी गणपतीला आणि हनुमानाला राखी बांधत असताना ती लाल रंगाची बांधावी. श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाची राखी बांधावे, असे सांगितले जाते. सोबतच रक्षाबंधन असणारा हा पवित्र धागा ज्या वस्तूंपासून, ज्या निसर्गातील गोष्टींपासून आपलं रक्षण होतं त्यांनाही बांधावा. जसे आपण ज्या घरात राहतो त्या घराला आणि आपण जे वाहन चालवतो त्या वाहनाला, आपली उपजीविका ज्या वस्तूंवर आहे त्या वस्तूंना आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना बांधावा. आपले रक्षण करणाऱ्या झाडाला सुद्धा राखी बांधावी, असे पेठकर महाराज सांगतात.
advertisement
अक्षदा कशा असाव्यात?
रक्षाबंधनाला भावाला ओवाळून अक्षदा लावली जाते. ही अक्षदा खंडित नसाव्यात. अक्षदा खंडित असल्यास भावाचे आयुष्य कमी होते असं सांगितलं जातं. त्यामुळे अक्षदा या टोकदार शाबूत असाव्यात. तसेच ताटात दिवा, पेढा किंवा एखादा गोड पदार्थ, सोन्याची अंगठी किंवा दागिना आणि हळदी कुंकू या वस्तू अवश्य ठेवाव्यात. प्रसाद म्हणून लोणी आणि त्यात साखर असेही देऊ शकता.
advertisement
पूर्व पश्चिम असावी दिशा
भावाला राखी बांधत असताना भावाने पूर्वेच्या दिशेने बसावे आणि ओवाळणाऱ्या बहिणीने पश्चिम दिशेने असावे. उत्तर दक्षिण या दिशेने कधीही अक्षदा लावू नये असंही सांगितलं जातं. रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाचं नातं आणखी घट्ट करणारा आणि बहिण भावाच्या भेटीचाही सण आहे. या सणाच्या दिवशी राखी बांधत असताना ताटात कोणत्या वस्तू असायला हव्या? राखी बांधत असताना त्याची दिशा ही पूर्व पश्चिम असावी, असे पद्माकर पेठकर यांनी सांगितले.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement