का साजरा होतो रक्षाबंधन? इंद्रदेव आणि महाभारताशी आहे संबंध!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
रक्षाबंधनाबाबत धार्मिक शास्त्रात अनेक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार, एकदा देव आणि राक्षसांमध्ये भयंकर युद्ध झालं होतं. त्यावेळी...
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या, 24 ऑगस्ट : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. हा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं जणू प्रतीक आहे. या दिवशी बहीण भावाकडे तिचं रक्षण करण्याचं मागणं मागते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हा सण साजरा केला जातो. खरंतर केवळ भावा-बहिणीच्याच नाही, तर प्रत्येक नात्यात केल्या जाणाऱ्या रक्षणाला रक्षाबंधन म्हटलं जातं. या सणाची सुरुवात कधीपासून झाली, याबाबत जाणून घेतल्यानंतर तुम्हालादेखील हे पटेल.
advertisement
अयोध्येचे विद्वान पवनदास शास्त्री याबाबत सांगतात की, रक्षाबंधनाबाबत धार्मिक शास्त्रात अनेक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार, एकदा देव आणि राक्षसांमध्ये भयंकर युद्ध झालं होतं. त्यावेळी राजा बळीने इंद्रदेवांचा पराभव केला होता. त्यामुळे इंद्रदेवांची पत्नी इंद्राणी यांनी भगवान विष्णू यांच्याकडे प्रार्थना केली होती. मग भगवान विष्णू यांनी इंद्राणी यांना एक पवित्र धागा दिला आणि तो आपल्या पतीच्या मनगटावर बांधण्यास सांगितलं. इंद्राणी यांनी आपल्या पतीच्या मनगटावर हा धागा बांधताच आश्रमात सुरू असलेल्या भयंकर युद्धात इंद्रदेव विजयी झाले.
advertisement
तसंच महाभारतात युधिष्ठिरने एकदा श्रीकृष्णाला विचारलं की, मी सर्व संकटं कशी पार करू शकेन? यासाठी काहीतरी उपाय सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला आपल्या सैनिकांना रक्षासूत्र बांधण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, युधिष्ठिरने आपल्या पूर्ण सैन्याला रक्षासूत्र बांधलं आणि त्यांच्या सैन्याचा विजय झाला.
advertisement
महाभारतात रक्षाबंधनाविषयी आणखी एक कथा प्रचलित आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने शिशुपालचा वध केला होता, तेव्हा श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली होती. त्यावेळी द्रौपदीने आपल्या साडीचं कापड फाडून कृष्णाच्या बोटावर बांधलं होतं. तेव्हा कृष्णाने द्रौपदीला रक्षण करण्याचं वचन दिलं आणि आपला शब्द पाळला.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
August 25, 2023 3:31 AM IST