भावाच्या हातावर प्रेमाने बांधली जाणारी राखी कशी तयार होते?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
गेल्या 25 वर्षांपासून हे कुटुंब हातानं राख्या तयार करत असून त्याला लहान विक्रेत्यांकडून मोठी मागणी असते.
जालना, 24 ऑगस्ट : बहिण-भावाच्या नात्यातला सर्वात महत्त्वाचा रक्षाबंधनाचा सण आता काही दिवसांवर आलाय. आपल्या लाडक्या भावाला ट्रेंडी राख्या बांधण्याची प्रत्येक बहिणीची इच्छा असते. त्यानिमित्तानं बाजारात वेगवेगळ्या राख्या आता दाखल झाल्यात. जालना जिल्ह्यातलं पोरवाल कुटुंब मागच्या 25 वर्षांपासून हातानं राख्या तयार करतात. त्यांनी या व्यवसायातून 30 महिलांना रोजगारही दिलाय.
जालनामधल्या कडबी मंडी भागात या खास राख्या तयार होतात. अनेकांना राखी खरेदी करण्यासाठी मुंबई किंवा गुजरातमध्ये जाणं शक्य होत नाही. त्यांना जालना शहरातच होलसेल दरात राखी मिळावी यासाठी हा व्यवसाय सुरू केल्याचं पोरेवाल यांनी सांगितलं. सध्या इथून संपूर्ण मराठवाड्यात राख्या पोहचवल्या जातात. या व्यवसायात पोरेवाल यांच्या 7 वर्षांच्या मुलीपासून ते 80 वर्षांच्या आईपर्यंत सर्वजण मदत करतात. त्याचबरोबर 30 महिलांनाही त्यांनी रोजगार दिला आहे.
advertisement
काय आहे ट्रेण्ड?
यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं जय श्री महाकाल, रुद्राक्ष असलेली राखी, ओम नम: शिवाय, त्रिशूळ आणि स्वस्तिक पँडल असलेल्या राख्या ट्रेण्ड होत आहेत. प्रवचनकार दीप मिश्रा यांच्यामुळे महादेव यांच्याशी संबंधित राख्या मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड होत असल्याचे राजू पारेवाल यांनी सांगितले. जालना शहरातील तरुणींनी तयार केलेल्या या राख्यांना संपूर्ण राज्यात मोठी मागणी आहे. होलसेल दरात राखी मिळत असल्याने किरकोळ विक्रेते देखील इथे राखी खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
advertisement
जालना शहरातील आरती काजळे यांचे फुटाणे विक्री करण्याचे दुकान आहे. हे काम सांभाळून त्या राखी निर्मितीचं काम करतात. या कामाचे त्यांना दहा हजार रुपये मिळतात. तर सध्या कॉलेजमध्ये शिकणारी दिशा राजपूतही इथं काम करते.एका दिवसात 300 राख्या मी बनवते. यातून मला चांगले पैसे मिळतात. याचा उपयोग मला शिक्षणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी होतो, असं दिशानं सांगितलं.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 24, 2023 12:10 PM IST