Video : 2 रुपयांपासून करा राखीची खरेदी; काय आहे बाजारात ट्रेंड?

Last Updated:

रक्षाबंधनाचा सण आता जवळ येतोय. यामुळे विविध डिझाइन आणि कलरच्या राख्यांनी डोंबिवली मधील बाजारपेठ फुललेली आहे.

+
News18

News18

डोंबिवली, 19 ऑगस्ट : रक्षाबंधनाचा सण आता जवळ येतोय. बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला हा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. राखीच्या एका धाग्याने बहीण आणि भावाचे अतूट बंधन जपले जाते. राखीच्या धाग्याप्रमाणेच रेशमी असलेले हे नाते अधिक फुलावे यासाठी विविध डिझाइन आणि कलरच्या राख्यांनी डोंबिवली मधील बाजारपेठ फुललेली आहे. या बाजारपेठेत तुम्ही 2 रुपयांपासून राखीची खरेदी करू शकतात.
कोणत्या राख्यांना पसंती?
साध्या आणि सुंदर राख्या घेण्याकडे बहिणींचा कल अधिक आहे. यामध्ये कुंदनाची राखी खरेदी करण्याला पसंती मिळत आहे. यामध्ये फक्त एक रुद्राक्ष, ओम, मोती, एक मणी, एक खडा आणि रेशमी धागा अशी ही कुंदनाची राखी असते. अनेक भाऊ देखील साधी आणि सुटसुटीत राखी हाताला बांधून घेणे अधिक पसंत करतात.
advertisement
कार्टून्सच्या राख्या
कार्टून्सच्या राख्या घेण्यासाठी छोट्या बहिणी अधिक पसंती देतात. तसेच बहिणीपेक्षा भाऊ छोटा असेल तरी देखील बहिणी आपल्या छोट्या भावाला या राख्या बांधतात. यामध्ये छोटा भीम सारख्या अनेक कार्टून्सच्या राख्या विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. या राख्यांची खासियत म्हणजे यामध्ये लाईट पेटत असल्याने या राख्या घेण्यासाठी छोट्या बहिणींनी गर्दी केली आहे.
advertisement
अमेरिकन डायमंडच्या राख्या
यावर्षी अमेरिकन डायमंड मधील राख्या आल्या आहेत. या राख्यांमध्ये विविध डिझाईन असून ओम, स्वस्तिक असलेले डिझाईनला मागणी आहे.
भाभी भैय्या राखी
काही ठिकाणी वहिनी आणि भावाला दोघानाही राखी बांधायची प्रथा आहे. अशावेळी भाऊ आणि वहिनीला एकाच कॉम्बिनेशनची राखी असावी यासाठी राखीच्या एका पाकिटात दोन्ही राख्या आसतात. वहिनीच्या बांगडीत अडकविण्यासाठी एक डोल किंवा लुंबा राखी असते तर भावाला हाताला बांधण्यासाठी एक राखी असते. या राखीला देखील खूप मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
advertisement
चांदीच्या राखी
चांदीच्या राखी घेण्याकडेही बहिणींचा कल आहे. यामध्ये दोन्ही बाजूला धागा आणि मध्ये चांदीचा छोटा गणपती किंवा चांदीचे स्वस्तिक अशा पद्धतीने राखी मिळत आहे. या व्यतिरिक्त रुद्राक्ष आणि चांदी असाही प्रकार पाहायला मिळत आहे. पूर्ण चांदी आणि पूर्ण सोन्याच्या राख्या देखील उपलब्ध आहेत.
advertisement
आपले नाते राखीच्या धाग्याने अधिक दृढ करण्यासाठी बहिणींनी राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. या सर्व राख्यांची किंमत 2 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Video : 2 रुपयांपासून करा राखीची खरेदी; काय आहे बाजारात ट्रेंड?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement