रक्षाबंधनासाठी पुण्यातील सर्वात स्वस्त बाजार; पैठणीच्या कधीही न पाहिलेल्या वस्तू पाहून बहीण खूश

Last Updated:

रक्षाबंधनासाठी तुम्ही विचारही केला नसेल असे सुंदर गिफ्ट्स इथं उपलब्ध आहेत.

+
News18

News18

पुणे, 17 ऑगस्ट :  रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचा सण. या नात्यात प्रेम भरपूर असलं तरी तितकंच भांडणही आहे. पण, रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व तक्रारी मिटवून दोघं एक होतात. या खास सणाच्या दिवशी बहिणीला राखी बांधल्यानंतर भाऊ तिला भेट देतो. हल्ली बहिणीही भावांना रिटर्न राखी भेट देऊ लागल्या आहेत. आता राखीमध्ये काय गिफ्ट द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही काही आयडिया तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यातल्या बाजारपेठेत या हटके वस्तू आल्या आहेत.
सदाशिव पेठेतल्या नागनाथ पार चौकात पैठणीच्या वस्तूंचे स्वप्नगंधा हे दुकान आहे. या दुकानात रक्षाबंधनासाठी अस्सल पैठणीच्या साडीपासून बनवलेल्या वस्तू आहे. या रक्षाबंधनला पैठणीपासून बनवलेल्या वस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट देऊ शकता.
advertisement
"या ठिकाणी पैठणीच्या कपडा पासून बनवलेल्या पन्नास रुपयांच्या स्क्रंचीज आहेत. दीडशे रुपयांना स्लिंग बॅग आहे, सुंदर अशा वेगवेगळ्या पैठणीपासून बनवलेले बटवे आहेत. याचे वेगवेगळे कॉम्बिनेशनही तुम्ही देऊ शकता.  तुमच्या छोट्या बहिणीला देण्यासाठी सुंदर असे पैठणीचे हेअर बँड आहेत. तसेच पैठणीच्या इयरिंग्स, गळ्यातले, छोट्या क्लिप अशा पैठणीपासून बनवलेल्या वस्तू इथं मिळतील, अशी माहिती ऋतुजा गोखले यांनी दिली.
advertisement
पैठणीचा सुंदर टी कोस्टरचा सेट सध्या सर्वांचं आकर्षण ठरत असून याची किंमत 400 रुपये आहे, अशी माहिती गोखलेयांनी दिली. पैठणीच्या साडीचा पदर एका फ्रेम मध्ये लावून सुंदर असा की होल्डर देखील उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर अगदी युनिक पद्धतीच्या पैठणीच्या साड्यांचे कव्हर असलेल्या नोटबुक्सही इथं तुम्ही रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून देण्यासाठी खरेदी करु शकता. त्या साड्यांवर हातानं केलेली कॅलिग्राफी देखील आहे.
advertisement
पैठणी आणि त्याच्यावर हाताने केलेली कॅलिग्राफी हा रक्षाबंधनच्या भेटवस्तूसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. त्याचबरोबर सुंदर असे लाकडी आणि पैठणीचे ज्वेलरी बॉक्स सुद्धा या ठिकाणी असून ते गिफ्ट देऊन तुम्ही या रक्षाबंधनाला सर्वांना खुश करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रक्षाबंधनासाठी पुण्यातील सर्वात स्वस्त बाजार; पैठणीच्या कधीही न पाहिलेल्या वस्तू पाहून बहीण खूश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement