बांबूची राखी पाहिलीत का? परदेशातही आहे मोठी मागणी
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
झोपडपट्टीतील महिलांना राखीने बळ दिले. बांबूपासून बनलेल्या राख्यांना परदेशात मोठी मागणी आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जीवन सुंदर करण्याचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी असतो. व्यवस्थेशी दोन हात करत एक महिला आकाशाला कशी गवसणी घालू शकते. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चंद्रपूरच्या अडगळीत झोपडपट्टीत राहणाऱ्या मीनाक्षी मुकेश वाळके या आहेत. महाराष्ट्र आणि देशाला त्या 'द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र' म्हणून परिचित आहेत.
advertisement
मीनाक्षी यांनी साधं आणि छोटसचं काम केलं पण वेगळ्या ढंगानं केलं. नुसतच हेवा वाटेल असं नाही तर त्यातून इतरांना प्रेरणा आणि व्यवसाय मिळेल असं केलं. राहायला स्वतःच घर नाही, कामासाठी पुरेशी जागा नाही, काम करायला भांडवल नाही, अशा स्थितीत मीनाक्षी यांनी जे पाऊल पुढे टाकले ते आज साता समुद्रापार पोहोचले आहे.
advertisement
advertisement
आता रक्षाबंधनचा सण जवळ आला आहे. मीनाक्षी आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी बनवलेल्या राख्यांना आता थेट युरोपातील देशांमधून मागणी आली आहे. यातून झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटाशी तोंड देणाऱ्या महिलांना राखीने बळ दिले आहे. बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या बनवणाऱ्या मीनाक्षी आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लॉकडाऊनमध्ये मीनाक्षी आणि त्यांच्या टीमचे मोठे नुकसान झाले. दीड वर्षापासून कामकाज ठप्प झाले. प्रदर्शनासाठी बनवलेला दीड ते 2 लाखांच्या हस्तकौशल्याचा साठा पडून राहिला. मात्र आता राखी बनवण्याच्या कामांनी महिलांना आधार दिला. राख्या बनवण्याचे लक्ष्य गाठता आले नसले तरी 25 हजारांपर्यंत राख्या त्या तयार करु शकल्या आहेत.