TRENDING:

घंट्यांचा नवस अन् रोडग्याचा नैवद्य, विदर्भातील या हनुमान मंदिरात आहे अनोखी प्रथा, Video

Last Updated:

विशेष म्हणजे मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविकांकडून मंदिराला घंटा दान दिली जाते आणि रोडग्याचा नैवद्य अर्पण केला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा: महाराष्ट्रातील गावोगावी विविध मंदिरे असून प्रत्येक मंदिराबाबत एखादी आख्यायिका असते. काही मंदिरांशी खास प्रथा किंवा परंपरा जोडल्या गेलेल्या असतात. अशीच अनोखी प्रथा वर्धा जिल्ह्यातील वर्धा देवळी मार्गावर असणाऱ्या सालोड येथील प्रसिद्ध मंदिराबाबत आहे. हनुमान मंदिर जागृत देवस्थान असल्याची भाविकांची धारणा असून दर मंगळवार आणि शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविकांकडून मंदिराला घंटा दान दिली जाते आणि रोडग्याचा नैवद्य अर्पण केला जातो.

advertisement

असं तयार झालं प्रसिद्ध मंदिर

"पूर्वी वर्धा येथील बजरंग परिहार नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना या ठिकाणी काहीतरी दृष्टांत झाला. त्यामुळे याठिकाणी त्यांनी हनुमानाचं छोटंसं मंदिर बांधले. बरेच वर्ष त्यांनी सेवा केली. मात्र काही वर्षांनी वृद्धापकाळाने त्यांच्याकडून सेवा होत नव्हती. त्यामुळे मंदिराकडे दुर्लक्ष होऊ लागलं. मग मी सालोड येथील रहिवासी असल्याने नेहमी मंदिरात यायचो. जवळजवळ 45 वर्षांपासून मी याठिकाणी येतोय. सुरवातीला मंदिरात मला लाईट नव्हती. लोकवर्गणीतून येथील विकासकामे केल्याचे विष्णुकुमार वांदिले यांनी सांगितले.

advertisement

View More

रंगांविना खेळली जाते होळी, महाराष्ट्रातलं असंही एक गाव, नेमकी ही परंपरा काय?

घंटा दान करण्याची परंपरा

हनुमान मंदिराची हळूहळू महती वाढत गेली. सर्वात प्रथम रुपराव हनुमंतराव झाडे यांनी एक मोठी घंटा दान केली. नंतर हळूहळू लोकांना या ठिकाणी घंटा दान करण्यास सुरुवात केली. मनोकामना पूर्ण झाल्यावर घंटा दान करण्याचं प्रमाण वाढत गेलं. एकदा असही झालं की काँग्रेसचे आमदार रंजीत कांबळे निवडून येण्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी मोठी पूजा अर्चना केली होती. तिन्ही जागेंपैकी एकटे कांबळे निवडून आले. तेव्हापासूनही या ठिकाणची प्रसिद्धी वाढत गेली, असंही वांदिले यांनी सांगितलं.

advertisement

मंगल कार्यालयात होतात शुभकार्य

सुरेंद्र महाकाळकर आणि रमेश होळघरे यांनी मंगल कार्यालयासाठी जागा दिली. या ठिकाणी मंगल कार्यालय बांधण्यात आलं असून वाढदिवस, लग्न, साक्षगंध अशासारखी शुभकार्य या ठिकाणी होत असतात. कालांतराने या मंदिरात मंगल कार्यालयासह शिवपंचायत आणि राम लक्ष्मण सीतेची मूर्तीही स्थापन करण्यात आली. त्यामुळे मंदिरात हनुमान जयंती महाशिवरात्री आणि रामनवमी आणि पौष पौणिमेला घोडेवाले बाबा यांचा पुण्यतिथी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरे होतात.

advertisement

पोरीनं पांग फेडलं! हलाखीच्या परिस्थितीवर मात करत हॉकी खेळाडू झाली पोलीस, Video

बाहेरील जिल्ह्यात ख्याती

नागपूर, यवतमाळ, अमरावती यासह इतरही जिल्ह्यातील भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर मोठा स्वयंपाक करतात. विशेषतः विदर्भातील प्रसिद्ध पाणग्यांचा म्हणजेच रोडग्यांचा नैवद्य याठिकाणी केला जातो. लोकसहभागातून मंदिराच्या विकासकामत मदत होतेय. मंदिरात आयोजित केल्या जाणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्तांचा सहभाग असतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
घंट्यांचा नवस अन् रोडग्याचा नैवद्य, विदर्भातील या हनुमान मंदिरात आहे अनोखी प्रथा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल