पोरीनं पांग फेडलं! हलाखीच्या परिस्थितीवर मात करत हॉकी खेळाडू झाली पोलीस, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हलकीच्या परिस्थितीतून मिळवलं यश यवतमाळची हॉकी खेळाडू योगिनी पोलिसात रुजू
अमिता शिंदे, प्रतिनिधी
यवतमाळ: जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर काही मुली मोठं यश संपादन करतात. अशीच कहाणी यवतमाळमधील हॉकी खेळाडू योगिनी भोयर हिची आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना आईनं व्याजानं पैसे काढून हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. योगिनीनं मोठ्या जिद्दीनं पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले आणि यश मिळवलं. सध्या ती यवतमाळ पोलीस मुख्यालय येथे कार्यरत आहे. तिचा हा प्रवास अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
advertisement
यवतमाळच्या योगिनी भोयर हिच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. घरात आई-वडील आणि चौघी बहिणी आहेत. यातील 2 बहिणी विवाहित आहेत. योगिनीला लहानपणापासून हॉकी खेळाची प्रचंड आवड आहे. तिनं पाचवीत शिकत असतानाच हॉकी खेळण्यास सुरुवात केली. हॉकीचा चेंडू तिनं यशाकडे टोलावला. विविध स्पर्धांमध्ये तिनं चांगलं यश मिळवलं. पण घरच्या परिस्थितीमुळं तिला सातत्यानं संघर्ष करावा लागला.
advertisement
वडिलांचा व्यवसाय कोरोनात पडला बंद
योगिनीच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वडिलांचा चहा टपरीचा व्यवसाय कोरोनाकाळात बंद पडला. सध्या एमआयडीसीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. आईने योगिनीच्या शिक्षण आणि हॉकी खेळासासाठी कसेबसे पैसे जमवले. व्याजाने पैसे काढून खेळासाठी दिले. आईमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे माझं हे यश आहे, असं योगिनी सांगते.
advertisement
आई-वडीलांच्या डोळ्यात अश्रू
योगिनीच्या यशाविषयी बोलताना आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसतात. योगिनी पाचव्या वर्गात शिकत असताना तिने खेळण्यास सुरुवात केली. तिचं शिक्षण बी. कॉम. बाबाजी दाते महाविद्यालय यवतमाळ येथून झालं. 2019 मध्ये होमगार्डचं प्रशिक्षण पूर्ण केलं. तर 2017 मध्ये विद्यापीठातील हॉकी स्पर्धेत सहभाग घेतला. 2023 मध्ये पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय येथे नोकरीला रुजू झाली. तिला तिच्या यशामध्ये तिचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक मनीषा आकरे याची खूप मोठी साथ असल्याचं योगिनी सांगते.
Location :
Yavatmal,Maharashtra
First Published :
March 17, 2024 10:24 PM IST