मुलांना शिकवायचं होतं, लाज न बाळगता 'ती' रस्त्यावर उतरली! आज जगतेय अभिमानाने

Last Updated:

गरज असल्याने चालवायची म्हणून रिक्षा चालवायची असं नाही, तर त्या अत्यंत जबाबदारीने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतात.

+
मनात

मनात इच्छा असेल, तर कोणतंही काम अवघड नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय.

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर : आज महिला प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतात. शिक्षण, क्रीडा, सुरक्षा, वैद्यकीय, व्यवसाय, वकिली, विज्ञान, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली स्वतःची ओळख निर्माण करतात. अशाच एका कष्टकरी, मेहनती स्त्रीची प्रेरणादायी कहाणी आज आपण महिला दिनाच्या निमित्ताने पाहणार आहोत.
रिक्षा हा आपल्या सोयीचा आणि आवडीचा प्रवास असतो. या प्रवासात सहसा कोणाला मळमळत नाही. कितीही दूरचा असला तरी हा प्रवास अगदी सुखकर होतो. आतापर्यंत आपण अनेक पुरुष रिक्षाचालक पाहिले असतील. शिवाय काही वर्षांपासून महिलासुद्धा सहजपणे उत्तम रिक्षा चालवतात. सोलापुरातील शोभा घंटेसुद्धा त्यापैकीच एक. मागील सहा वर्षांपासून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या रिक्षा चालवतात. सोलापूर शहरात रिक्षावाल्यांची संख्या आहे पंधरा हजार. त्यात मोजक्याच महिला रिक्षाचालक आहेत.
advertisement
शोभा यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी रिक्षा चालवायला सुरुवात केली. 2018 पासून त्या सोलापूर शहरात हे काम करतात. विशेष म्हणजे गरज असल्याने चालवायची म्हणून रिक्षा चालवायची असं नाही, तर त्या अत्यंत जबाबदारीने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतात. मनात इच्छा असेल, तर कोणतंही काम अवघड नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
शोभा यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. त्यांच्या एकट्याच्या पगारावर घर चालणं अशक्य होतं. मुलांना मनासारखं शिक्षण घेणं अशक्य होतं. त्यामुळे परिस्थितीला आव्हान देत त्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडल्या. महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला त्यांनी एका खासगी संस्थेकडून रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मग बँकेतून कर्ज घेऊन एक रिक्षा विकत घेतली. आता त्यांचा हा व्यवसाय सुरळीत सुरू आहे.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
मुलांना शिकवायचं होतं, लाज न बाळगता 'ती' रस्त्यावर उतरली! आज जगतेय अभिमानाने
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement