शेतकऱ्याची लेक मोठ्या कष्टाने झाली मुख्याध्यापिका; पण नोकरीत रमलं नाही मन, राजीनामा देत घेतला मोठा निर्णय
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शमीना खानम आणि मोहम्मद अली खान असे या दाम्पत्याचे नाव आहे. शमीना यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाची नोकरी सोडली. यानंतर एक मोठा निर्णय घेतला.
कुंदन कुमार, प्रतिनिधी
गया : आंबा आणि पेरूची बाग ही अशी बाग आहे ज्यामुळे शेतकरी चांगला पैसा कमावू शकतात. बिहारच्या गया जिल्ह्यात अनेक शेतकरी ही सेती करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. आज अशाच एका दाम्पत्याबाबत जाणून घेऊयात.
हे दाम्पत्य गया जिल्ह्यातील दुर्गम इमामगंज भागातील कोठी येथील रहिवासी आहे. शमीना खानम आणि मोहम्मद अली खान असे या दाम्पत्याचे नाव आहे. गया शहरात त्यांचा व्यवसाय आहे. मात्र, शेती करणे हा त्यांचा छंद आहे. शमीना यांनी शेतीसाठी खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाची नोकरी सोडली. यानंतर त्या आता शेतीत आपला वेळ घालवत आहे.
advertisement
कोठी गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. पूर्वी तेथे तांदूळ आणि गव्हाची लागवड व्हायची. मात्र त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर या लोकांनी चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी आणि लोकांना रसायनमुक्त अन्न मिळेल यासाठी कोणते पीक लावावे असा विचार केला. यानंतर त्यांनी बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी 7 वर्षांपूर्वी सुमारे 6 बिघे जमिनीवर 1200 हून अधिक आंबा, पेरू, लिंबू रोपांची लागवड केली होती. आज त्यांच्या शेतात अलाहाबादी सफेदा, केजी वन आणि तैवानी पिंक यासह अनेक प्रकारचे पेरू आहेत. तसेच आंब्याच्या झाडांमध्ये मल्लिका, जर्दालू, दशहरी प्रजातींचा समावेश आहे.
advertisement
प्रति वर्ष किती नफा -
त्यांच्या शेतात आंबा आणि पेरूचे एकूण उत्पादन प्रतिवर्ष 50 क्विंटल आहे आणि आंबा आणि पेरूची मागणी गया व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही आहे. यामुळे त्यांचा वार्षिक नफा हा 6-7 लाख रुपयांचा आहे. इतकेच नाही तर शमीना हे स्वतः पेरू जॅम/जेली बनवता. त्याला बिहारबाहेरही मोठी मागणी आहे. शेताची देखभाल करण्यासाठी त्यांनी 4-5 जणांना रोजगारही दिला आहे.
advertisement
सुरूवातीला खूप नुकसान -
सुरुवातीच्या काळात शॉर्टसर्किटमुळे पेरूच्या बागेला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, नंतर ते हळूहळू सावरले. आज पती-पत्नी दोघेही यशस्वी शेतकरी झाले आहेत. मात्र, या भागात पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरिंग आणि पाण्याचा प्रश्न सरकारने सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शमीना सांगतात की, त्या शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांचे वडील मोठे शेतकरी होते. मात्र, पूर्वी शेतात फक्त तांदूळ किंवा गहू असायचा. त्यात फारसा फायदा होत नव्हता. त्यामुळे आम्ही बागायती शेती करण्याचा विचार केला आणि आज आम्ही दोघे मिळून छान शेती करत आहोत. तसेच मो. अली खान यांनी सांगितले की, ते पेरूचा जाम बनवतात. त्याला मोठी मागणी आहे. दररोज 15 किलो पेरू जाम तयार केला जातो. तसेच त्यांची फळे आणि जाम स्थानिक बाजारपेठेनंतर देशात अनेक ठिकाणी पाठवले जातात, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Bihar
First Published :
March 08, 2024 4:03 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्याची लेक मोठ्या कष्टाने झाली मुख्याध्यापिका; पण नोकरीत रमलं नाही मन, राजीनामा देत घेतला मोठा निर्णय