वैशाख महिन्यात लक्ष्मी, विष्णू आणि तुळशीची पूजा केल्याने दूर होतात आर्थिक संकट
अयोध्याचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की आज म्हणजेच 13 एप्रिलपासून वैशाख महिना सुरू झाला असून तो 12 मे पर्यंत चालेल. मान्यतेनुसार, वैशाख महिन्यात अन्नधान्याची देवी माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि तुळशी माता यांची पूजा करण्याची प्रथा आहे. वैशाख महिन्यात खऱ्या मनाने भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची पूजा केल्याने आर्थिक संकटातूनही आराम मिळतो.
advertisement
वैशाख महिन्यात तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ खास उपाय
जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख-समृद्धी हवी असेल, तर वैशाख महिन्यात तुळशी संबंधित काही खास उपाय नक्की करा. वैशाख महिन्यात तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी, दररोज सकाळी स्नान केल्यावर खऱ्या मनाने तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा. विधिवत पूजा करा. तसेच, तुळशी मातेला 16 शृंगाराचे साहित्य अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख येते आणि वैवाहिक जीवन आनंदी होते.
भगवान विष्णूसोबत तुळशीची पूजा केल्याने मिळेल सौभाग्य
याशिवाय, वैशाख महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्यानंतर दिवा लावावा. नैवेद्यात तुळशीची पाने समाविष्ट करावी. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि नशीब चमकू शकते. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तर वैशाख महिन्यात तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असं मानलं जातं की असं केल्याने आर्थिक संकटातून सुटका मिळते आणि धनलाभाचे योगही जुळून येतात. या वैशाख महिन्यात भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची मनोभावे पूजा करून तुम्हीही सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता प्राप्त करू शकता.
हे ही वाचा : घरात शिवलिंग स्थापित करताय? शिवभक्तांनी लक्षात ठेवावेत 'हे' 5 नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ
हे ही वाचा : रात्री कुत्र्याच्या रडण्याने भीती वाटते? त्यामागचा अर्थ काय? धर्म ग्रंथाबरोबर विज्ञानही असं सांगतं की...