नर्मदापुरम : मंगळ ग्रहाला ग्रहमालिकेतला प्रधान मानलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या राशीला मंगळ असणं म्हणजे अत्यंत धोक्याचं असतं. मात्र मंगळ आपल्या आयुष्यात केवळ नकारात्मक क्षण घेऊन येत नाही, तर अनेक सुखद क्षणांची चाहूलही या ग्रहामुळे लागते. आता तुमच्याही आयुष्यात याच ग्रहामुळे आनंद येणार आहे.
मंगळ सध्या आहे धनू राशीत. त्यातून तो पुढच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत जाणार आहे. ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या कुंडलीत ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यावरच व्यक्तीची दशा आणि दुर्दशा ठरत असते. आता मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करणार असल्याने अर्थातच त्याचा सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होईल.
advertisement
संक्रांतीनंतर 3 राशींचा सुरू झालाय वाईट काळ, नाती दुरावली, आता अपघात व्हायला वेळ नाही लागणार!
मंगळ नावाप्रमाणेच काही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात ग्रहण घेऊन येईल, परंतु 3 राशींच्या व्यक्तींना मात्र आनंदाचे, सुखाचे दिवस पाहायला मिळतील. या राशी आहेत मेष, धनू आणि मीन. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात पुढच्या महिन्यात इतकं सुख येईल की ते त्यांच्या ओंजळीत मावता मावणार नाही.
शनी कुंभमध्ये आता वर्षभर मुक्कामी; घाबरू नका, 4 राशीच्या व्यक्तींना मिळणार सर्वकाही!
मेष : आपल्याला मंगळ ग्रहाच्या मकर प्रवेशाने प्रचंड लाभ होणार आहे. ज्या व्यक्तींनी पूर्वी गुंतवणूक केली असेल, त्यांना आता त्यातून चांगला नफा मिळेल. शिवाय करियरमध्ये आपली जबरदस्त प्रगती होईल आणि परिणामी मान-सन्मान वाढेल. शिवाय आरोग्य चांगली साथ देईल. कुटुंबियांचा उत्तम पाठिंबा मिळेल. घरातलं वातावरणही आनंदाचं असेल.
धनू : आपल्यासाठीदेखील मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन फायद्याचं ठरेल. यामुळे आपल्यासाठी प्रामुख्याने धनयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती आधीपेक्षा आता उत्तम होईल. कामानिमित्त परदेशी प्रवास होण्याशी शक्यता आहे. आपल्याला जोडीदाराकडून भरपूर प्रेम मिळेल. घरात सुख, समृद्धीचं वातावरण असेल.
मीन : मंगळ ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचे आपल्याला शुभ लाभ पाहायला मिळतील. या काळात आपण प्रचंड ऊर्जावान राहाल. कामात लक्ष केंद्रित करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. परंतु आपल्याला मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काम आणि कुटुंब दोन्हीमध्ये व्यवस्थित सांगड घालण्याचा प्रयत्न करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा