शनी कुंभमध्ये आता वर्षभर मुक्कामी; घाबरू नका, 4 राशीच्या व्यक्तींना मिळणार सर्वकाही!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
2024 Prediction: असं नाहीये की, शनी केवळ अशुभ फळ देतो. तर, शनी जेव्हा शुभ फळ देतो, तेव्हा त्या विशिष्ट राशींच्या व्यक्तींना इतकं सुख मिळतं की, ते त्यांच्या ओंजळीत मावता मावत नाही.
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना न्यायदेवता मानलं जातं. कुंडलीतील त्यांच्या स्थानामुळे व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो आणि अधोगतीही होऊ शकते. यंदा अनेक राशींसाठी शनीचं स्थान शुभ असणार आहे. कारण यंदा बाराही महिने शनी कुंभ राशीतच विराजमान असेल. कुंभ राशी शनीदेवांना प्रिय मानली जाते. हे त्यांचं घर असल्याचं मानलं जातं.
ज्योतिषी पंडित पंकज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी ग्रहाला क्रूर, पापी ग्रह म्हणतात. कुंडलीत त्याचं स्थान अशुभ असेल, तर व्यक्तीला नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र असं नाहीये की, शनी केवळ अशुभ फळ देतो. तर, शनी जेव्हा शुभ फळ देतो, तेव्हा त्या विशिष्ट राशींच्या व्यक्तींना इतकं सुख मिळतं की, ते त्यांच्या ओंजळीत मावता मावत नाही. यंदा शनीदेवांमुळे कोणत्या राशींना शुभफळ मिळणार पाहूया.
advertisement
मेष : आपल्यासाठी हे पूर्ण वर्ष सुखाचं आहे. आपल्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मित्र-मंडळींसोबत नातेसंबंध चांगले राहतील. घरात धार्मिक कार्य पार पडेल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. आपली आर्थिक बाजू भक्कम राहील. अनेक शुभ कार्य घडतील.
advertisement
वृषभ : आपल्याला नोकरीत नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापार विस्तारेल. घरात शांतता येईल. धनलाभ होईल. दाम्पत्य जीवन सुखाचं राहील. शिक्षणक्षेत्राशी संबंधित असाल तर आपल्याबाबत शुभ कार्य घडेल. आपण यावर्षी नवं काम सुरू करू शकाल.
मिथुन : नोकरीत आपली प्रगती होईल, सर्वांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. घरात धार्मिक कार्य पार पडू शकतं. धनसंपत्ती वाढेल. नोकरी आणि व्यापारासाठी अनुकूल काळ आहे. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. सगळीकडून आपल्याला लाभ होईल.
advertisement
सिंह : आपल्या घरात धार्मिक कार्य पार पडू शकतं. मित्राच्या साथीने आपली प्रगती होईल. आरोग्यासंबंधित व्याधींपासून सुटका मिळेल. मन शांत राहील. आर्थिक बाजूही भक्कम असेल. वैवाहिक जीवनात सुख येईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो या लिंकवर क्लिक करा.
Location :
Madhya Pradesh
First Published :
January 18, 2024 3:21 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
शनी कुंभमध्ये आता वर्षभर मुक्कामी; घाबरू नका, 4 राशीच्या व्यक्तींना मिळणार सर्वकाही!