अयोध्या : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्रांच्या स्थानबदलला विशेष महत्त्व आहे. शुक्र ग्रहाला धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. तर, गुरू हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो, त्याला ज्ञानकारक म्हणतात. त्यामुळे हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा अर्थातच त्यांची कृपादृष्टी असलेल्या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतात. सर्व सुख जणू त्यांच्या पायाशी येतं. महत्त्वाचं म्हणजे ही घडी आता काही दूर नाही. येत्या एप्रिल महिन्यात या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे.
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दोन ग्रह जवळ येतात तेव्हा त्याला युती म्हणतात. एप्रिल महिन्यात शुक्र आणि गुरूची युती होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. त्यापैकी 3 राशी अशा आहेत की, ज्यांचं नशीब उघडेल.
स्वत:च्याच पैशांसाठी मागावी लागतेय भीक? आता असं नाही होणार, 'गुरू' मिळवून देईल पैसे
तूळ : आपल्यासाठी एप्रिल महिना अत्यंत सकारात्मक असणार आहे. वैवाहिक जीवनात सुख येईल. आपले अडकलेले पैसे मिळतील. व्यापार विस्तारेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
'सकट चौथ' म्हणजे काय? बाप्पाची करा पूजा, आयुष्यात कसलीच भासणार नाही कमी
मेष : एप्रिल महिन्यात आपल्याला पदोपदी धनलाभ होईल. व्यापार विस्तारेल. नोकरीत यश मिळेल. विद्यार्थ्यांना परिक्षेत चांगले गुण मिळतील. व्यापारात अडकलेले पैसे मिळतील.
मीन : आपल्यासाठी हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. आपला परदेशी प्रवास होऊ शकतो. आजारपणातून मुक्ती मिळेल. वैवाहिक जीवनात सुख येईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा