वाराणसी : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीप्रवेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या ग्रहाने एखाद्या राशीत प्रवेश केला की त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. मग त्यातून काही राशींना सुखच सुख मिळतं, तर काही राशींना मात्र दुःख सोसावं लागतं. आता 1 फेब्रुवारीला बुध ग्रहाचा मकरप्रवेश होणार आहे. मकर ही शनीची रास आहे. त्यामुळे या राशीप्रवेशाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार हे नक्की.
advertisement
बुध ग्रहाचा विशेषतः आर्थिक बाबींवर परिणाम होतो. काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी बुध ग्रहाचा मकर राशीत प्रवेश होईल. त्यानंतर 20 फेब्रुवारीपर्यंत बुध याच राशीत असेल. हा काळ कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरणार पाहूया.
शुक्र आणि गुरूची होणार युती, 'या' राशींचं उघडणार नशीब, मिळणार सर्वकाही!
वृषभ : आपल्यासाठी हा राशीप्रवेश अत्यंत शुभ असणार आहे. व्यवसायात चांगला नफा होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रचंड सुखद क्षणांचा अनुभव घ्याल.
स्वत:च्याच पैशांसाठी मागावी लागतेय भीक? आता असं नाही होणार, ‘गुरू’ मिळवून देईल पैसे
कर्क : आपला व्यवसाय असेल तर त्यात लाभ होईल, आपण नोकरी करत असाल तर त्यातही प्रगती होईल. खरंतर आपल्याला एखादी सुवर्णसंधी मिळू शकते. कदाचित तुमचं प्रमोशन होऊ शकतं.
धनू : या काळात आपली बचत अत्यंत चांगल्या प्रमाणात होणार आहे. समाजात आपला मान-सन्मान वाढेल. नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल, तर त्यासाठी हा उत्तम काळ आहे.
मीन : आपल्यासाठी हे अगदी सुवर्ण दिवस असणार आहेत. नव्या नोकरीत रुजू झालात किंवा नवा व्यवसाय सुरू केलात तरी त्यातून फायदाच फायदा होईल. नोकरीपेक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ लाभदायी आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा