TRENDING:

या 4 राशी आहेत लाजाळू, गूढ स्वभावामुळे प्रेम व्यक्त करायला घेतात प्रचंड वेळ

Last Updated:

या राशीचे व्यक्ती रहस्यमय व्यक्तित्वाचे म्हणून ओळखले जातात.या राशीचे व्यक्ती रहस्यमय व्यक्तित्वाचे म्हणून ओळखले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 17 सप्टेंबर: जेव्हा समोरचा काय विचार करत असेल किंवा त्याला कसे वाटत आहे हे आपण सांगू शकत नाही, तेव्हा अशा व्यक्तीसोबत डेटवर जाण्यापेक्षा अधिक चिंताजनक काहीही नाही. ही एक मोठी समस्या आहे. आपण अद्याप ओळखत असलेल्या एखाद्याच्या वर्तनाचा अचूक अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे सोपे नाही. प्रियकर/प्रेयसीसोबत फिरायला जाणे हे काही राशींच्या व्यक्तींबाबत अतिशय अवघड टास्क होऊन बसते. परंतु सत्य हे आहे की, तुम्ही त्यांच्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

वास्तुशास्त्रातील या चुका देतात दारिद्र्याला आमंत्रण, पती-पत्नीत होतो विसंवाद

वृश्चिकया राशीचे व्यक्ती रहस्यमय व्यक्तित्वाचे म्हणून ओळखले जातात.या राशीचे व्यक्ती रहस्यमय व्यक्तित्वाचे म्हणून ओळखले जातात.

या राशीचे व्यक्ती रहस्यमय व्यक्तित्वाचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मनात काय आहे हे शोधणे कधीही सोपे नसते. ते अलिप्त किंवा घाबरवणारे वास्तव असू शकतात, शक्यता आहे की तुमचा वृश्चिक जोडीदार फक्त तुम्ही विश्वासार्ह आहात की नाही हे ठरवण्याचा प्रयत्न करत असेल. या जन्मजात संशय घेणाऱ्या राशीचा विश्वास मिळवण्यासाठी संयम, सातत्य आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे.

advertisement

मकर

मकर राशीला जाणून घेण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, ते जास्त रिझर्व्ह वाटू शकतात. परंतु त्यांच्या दबलेल्या वागण्याने फसू नका. त्यांच्या शांत, गूट व्यक्तित्वाखाली एक विनोदी आणि आनंदी स्वभाव दडलेला असतो. मकर राशीला त्यांच्या मूळ स्वभावात येण्यासाठी पुरेसा आल्हाददायक वाटू देणे गरजेचे आहे. यानंतरच त्यांची खेळकर बाजू दिसेल.

कर्क

कर्क राशीकडे प्रेमाचे भांडार असते. त्यांचे प्रेम कधीच आटत नाही, पण तुम्हाला ते कधीच कळणार नाही. पण या रोमँटिक राशीच्या लोकांना त्यांचे हृदय सहजपणे व्यक्त करण्यात मोठी अडचण असते. त्यांचा अत्यंत संवेदनशील स्वभाव जोडीदारासोबत त्यांना आत्मविश्वासाने वावरू देत नाही. खुले आणि प्रामाणिक असण्याऐवजी, ते मजबूत किंवा अतिआत्मविश्वास दाखवण्याच्या प्रयत्नात अडकतात. पण एकदा तुम्ही त्यांना त्यांच्या मित्रांबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलायला लावले की, त्यांचा प्रेमळ स्वभाव स्पष्ट होतो.

advertisement

कन्या

कन्या राशीच्या व्यक्ती प्रेमात आकंठ डुंबतात. पण नेहमीच गोंधळलेल्या असतात. या राशी नियम पाळणाऱ्या, प्रेमळ, व्यावहारिक आणि विश्लेषणात्मक म्हणून ओळखल्या जातात. यापैकी कोणतेही गुण नकारात्मक नसले तरी अनेकांना या व्यक्त कठोर वाटू शकतात. पण सत्य हे आहे की कन्या राशीला खरोखरच मदत करायची असते. बर्‍याचदा, त्यांना हेदेखील कळत नाही की ते दुरावत चालले आहेत. पण, जर तुम्ही त्यांना हसायला लावू शकत असाल, तर ते लगेच उत्कट प्रतिसाद देतात.

advertisement

या 8 विचित्र गूढ अनुभवांमुळे मनात तयार होते भीती, अनेकांना वाटतो आत्म्यांचा वावर

या राशी खूप लाजाळू, शांत किंवा रिझर्व्ह वाटत असल्या तरी प्रेमात पडण्यासाठी त्या पुरेसा वेळ नक्कीच देतात. एखाद्याला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी असे करत असतात. बऱ्याचदा त्यांनाही एखादी व्यक्ती आवडत असेल तरीही ते संयमानेच प्रेमाचे एकेक पदर उलगडत जातात.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
या 4 राशी आहेत लाजाळू, गूढ स्वभावामुळे प्रेम व्यक्त करायला घेतात प्रचंड वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल