TRENDING:

या 8 विचित्र गूढ अनुभवांमुळे मनात तयार होते भीती, अनेकांना वाटतो आत्म्यांचा वावर

Last Updated:

प्राचीन चिनी समजुतीनुसार, फुलपाखरे मरण पावलेल्या प्राण्यांचे प्रतीक आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 30 ऑगस्ट: भूतांच्या कथा आणि चर्चा ऐकताना आपल्या सर्वांना एक प्रकारचा विचित्र आणि मनोरंजक अनुभव येतो. तुम्हीही भूतांच्या भयकथा अनेकदा ऐकल्या असतील. काही लोकांचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. काही लोक त्यांना मूर्खपणा म्हणतात. विश्वास ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ही वैयक्तिक बाब आहे. पण काही अनुभव बुद्धिवादी मानवालाही निरुत्तर करतात हे नक्की.
News18
News18
advertisement

वास्तुशास्त्रातील या चुका देतात दारिद्र्याला आमंत्रण, पती-पत्नीत होतो विसंवाद

सर्वात प्रथम भूत किंवा आत्मा यांबद्दल काय-काय मान्यता किंवा अंधश्रद्धा आहेत ते पाहुया, भूत म्हणजे भटकणारा आत्मा असा सर्वसाधारण विश्वास आहे. आत्मा चांगली आणि वाईट असू शकते. आता तुम्ही देवाला पाहू शकत नाही, तुम्ही फक्त त्याला अनुभवू शकता, त्याच प्रकारे तुम्ही आत्म्याला अनुभवू शकता, असेही म्हटले जाते. यामुळेच खाली साधारणपणे जाणवणारे 8 विचित्र अनुभव सांगत आहोत ज्यामुळे लोकांना आत्माचा वावर असल्याचे वाटते.

advertisement

1. बल्ब चालू आणि बंद होणे

हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल, पण आध्यात्मिक गुरू आणि मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की विजेवर आत्म्याचे नियंत्रण असते. तुमच्या लक्षात आले असेल की, तुमचा नवा बल्बही विचित्र पद्धतीने लागतो किंवा बंद होतो. हे सर्व आत्म्याच्या उपस्थितीचा पुरावा असू शकते, असेही बरेच जण मानतात.

2. ठराविक वेळी फिरणारे घड्याळ अचानक थांबणे

advertisement

तुम्ही घड्याळात नवीन बॅटरी घातली आहे, तरीही अनेकदा ते ठराविक वेळी थांबते. जर ती वेळ तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित कोणत्याही अपघाताची किंवा या जगात नसलेल्या कोणत्याही व्यक्तीची आठवण करून देत असेल तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला काहीतरी सांगायचे आहे, असे बहुतेक मानतात.

3. विचित्र आवाज आणि संगीत

असा आवाज जर तुम्हाला वारंवार ऐकू येत असेल, जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की कोणी तुमचे नाव घेत आहे, तर कोणीतरी व्यक्ती, जो या जगात नाही, तुम्हाला हाक मारत आहे, असे मानतात.

advertisement

4. खोलीच्या तापमानात अचानक बदल

जर अचानक तुमच्या खोलीत थंडी विनाकारण वाढू लागली आणि तुमच्या शरीराचे तापमान कमी होऊ लागले, तर समजून घ्या की तुमच्याशिवाय तिथे कोणीतरी आहे.

5. अचानक फुलांचा वास येणे

एखाद्या निर्जन जागी फिरत असताना अचानक सुगंध येऊ लागला तर समजावे की त्या ठिकाणी आत्म्याचा वास आहे. तुम्हाला तिथेही इजा होऊ शकते, त्यामुळे अशा ठिकाणाहून बाहेर पडणे केव्हाही चांगले.

advertisement

6. फुलपाखरे घिरट्या घालतात

प्राचीन चिनी समजुतीनुसार, फुलपाखरे मरण पावलेल्या प्राण्यांचे प्रतीक आहेत आणि एका शरीरातून दुसर्‍या शरीरात प्रवास करत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फुलपाखरांचा कळप उडताना दिसला तर समजून घ्या की तुमची जवळची व्यक्ती दुसऱ्या जगाच्या प्रवासाला निघून गेली आहे.

7. मृत लोकांचे चेहरे पाहणे

काही लोक त्यांच्या मृत नातेवाईकांचे किंवा जवळच्या मित्रांचे चेहरे पाहत राहतात. याचा अर्थ त्यांना तुमच्याशी बोलायचे आहे, असेही अनेक जण मानतात.

लक्ष्मीप्राप्तीसाठी करा गुलाबाचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

8. सावल्यांचा खेळ

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकदा हे लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही तिरकसपणे पाहता तेव्हा तुम्हाला सावली दिसते, पण सरळ दिसताच ती अदृश्य होते. हे सर्व कोणीतरी आपल्याशी संपर्क साधू इच्छित आहे, याचे संकेत मानले जातात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
या 8 विचित्र गूढ अनुभवांमुळे मनात तयार होते भीती, अनेकांना वाटतो आत्म्यांचा वावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल