TRENDING:

Palmistry: भाग्यवान लोकांच्या तळहातावर ठळक असतात या रेषा! धन-वैभवाचा होतो वर्षाव

Last Updated:

Palmistry: प्रत्येक व्यक्तीच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या असतात. त्यात काही आकृत्या आणि चिन्हंही असतात. हातावरच्या रेषा, चिन्हं, आकृत्या यांच्या साह्याने त्या व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज वर्तवता येतो. त्यापैकी काही रेषा, चिन्हं आणि आकृत्या शुभ असतात. त्या कोणत्या याविषयी जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भविष्य घडवणं आपल्याच हातात असतं. आपण आज करत असलेल्या गोष्टींची भविष्यात चांगली किंवा वाईट फळे मिळतात. भविष्यातील बऱ्या-वाईट गोष्टींसाठी आपण वर्तमानातच पायाभरणी करत असतो; पण अगदी शब्दशः सांगायचं, तर आपल्या हातात भविष्याचे संकेत देणाऱ्या रेषा असतात. या रेषांवरून प्रत्येक व्यक्तीचं भविष्य काय आहे, याचे अंदाज बांधता येतो. यात काही रेषा अशा असतात, की ज्यांच्यामुळे आपलं भाग्य उजळतं. संख्याशास्त्रावरून, जन्मपत्रिकेवरून, हस्तरेषांवरून किंवा चेहऱ्यावरूनही भविष्य सांगितलं जातं. अगदी सही करण्याच्या पद्धतीवरूनही व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. हातावरून भविष्य ओळखण्यासाठी (Palmistry) त्यावरच्या रेषांचा, चिन्हांचा अभ्यास असावा लागतो. त्याला पामिस्ट्री अर्थात हस्तरेषाशास्त्र असं म्हणतात.
News18
News18
advertisement

प्रत्येक व्यक्तीच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या असतात. त्यात काही आकृत्या आणि चिन्हंही असतात. हातावरच्या रेषा, चिन्हं, आकृत्या यांच्या साह्याने त्या व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज वर्तवता येतो. त्यापैकी काही रेषा, चिन्हं आणि आकृत्या शुभ असतात. त्या कोणत्या याविषयी जाणून घेऊ.

हस्तशास्त्रात काही रेषांना शुभ आणि महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. हृदयरेषा (Heart Line), जीवनरेषा (Life Line), लग्नरेषा (Marriage Line) आणि भाग्यरेषा (Fate Line) अशा त्या चार रेषा आहेत. या रेषा कोणत्या पद्धतीनं हातावर आहेत, त्यावरून त्यांचं फळ शुभ असेल की अशुभ हे लक्षात येतं. या चारही रेषा सगळ्यांच्याच हातावर असतात असं नाही. त्यातही या रेषा शुभ स्थितीत असतील, असे हात खूप कमी जणांचे असतात. भाग्यरेषा कमी व्यक्तींच्या हातावर असते. ज्यांच्या हातावर ही रेषा शुभ स्थितीत असते, त्यांना खूप सुख-समृद्धी लाभते.

advertisement

ऑफिस, कामाच्या ठिकाणी टेबलावर असाव्या या गोष्टी; नोकरी-धंद्यात मिळतं मोठं यश

हाताच्या खालच्या भागातून निघून मधल्या बोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या शनिपर्वतापर्यंत जी रेष जाते, ती भाग्यरेषा असते. चंद्र क्षेत्रापासून निघून शनिपर्वतापर्यंत भाग्यरेष गेली असेल, तर त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतं. अशा व्यक्ती आपल्या क्षेत्रात खूप नावलौकिक कमावतात, तसंच इतरांनाही सन्मान देतात. त्यामुळे या व्यक्ती लोकप्रिय ठरतात. ज्यांच्या हातावर भाग्यरेषा जीवनरेषेपासून सुरू होत असेल आणि शनिपर्वतापर्यंत पोहोचत असेल, अशा व्यक्तींना कधीही पैशांची चणचण भासत नाही. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते.

advertisement

मणिबंधापासून सुरू होऊन ही रेष सरळ शनिपर्वतापर्यंत जात असेल किंवा मधल्या बोटाच्या मुळापर्यंत जात असेल, तर अशी रेष खूपच शुभ मानली जाते. ही रेष गडद असून मध्ये कुठे तुटली नसेल, तर अशा व्यक्तीला आयुष्यात खूप संपत्ती, मान-सन्मान, मोठं पद असं सर्व काही मिळतं. कोणत्याही क्षेत्रात गेल्या, तरी अशा व्यक्ती स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. हातावरच्या रेषा भविष्याचे अंदाज बांधायला मदत करत असतात. त्या दिशेनं मेहनत करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं.

advertisement

आठवडा मौजमजेचा! त्रिग्रही योगामुळे या राशींना मिळणार खुशखबर, साप्ताहिक राशीफळ

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Palmistry: भाग्यवान लोकांच्या तळहातावर ठळक असतात या रेषा! धन-वैभवाचा होतो वर्षाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल