Weekly Rashi Bhavishya In Marathi: आठवडा मौजमजेचा! त्रिग्रही योगामुळे या राशींना मिळणार अनेक खुशखबर, साप्ताहिक राशीभविष्य

Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024 या आठवड्यासाठीचं राशिभविष्य.
1/12
मेष (Aries): मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशिबाऐवजी कर्मावर अवलंबून राहावं लागेल. राग किंवा भावनेच्याभरात कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला बाहेरची कामं करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठं यश मिळू शकतं. या आठवड्यात तुम्ही तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला करिअर आणि व्यवसायातही अपेक्षित यश मिळू शकतं. आठवड्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास घडेल आणि त्यामुळे इच्छित नफा मिळेल. या संपूर्ण आठवड्यात तुम्ही व्यवसायात जोखमीची गुंतवणूक टाळावी. काही काळापासून आजारी असलेल्यांच्या प्रकृतीत या आठवड्याच्या अखेरीस चांगली सुधारणा दिसून येईल. तुम्हाला दिनचर्या संतुलित ठेवावी लागेल. प्रेम संबंध सामान्य राहतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Green
Lucky Number: 2
मेष (Aries): मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशिबाऐवजी कर्मावर अवलंबून राहावं लागेल. राग किंवा भावनेच्याभरात कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला बाहेरची कामं करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठं यश मिळू शकतं. या आठवड्यात तुम्ही तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला करिअर आणि व्यवसायातही अपेक्षित यश मिळू शकतं. आठवड्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास घडेल आणि त्यामुळे इच्छित नफा मिळेल. या संपूर्ण आठवड्यात तुम्ही व्यवसायात जोखमीची गुंतवणूक टाळावी. काही काळापासून आजारी असलेल्यांच्या प्रकृतीत या आठवड्याच्या अखेरीस चांगली सुधारणा दिसून येईल. तुम्हाला दिनचर्या संतुलित ठेवावी लागेल. प्रेम संबंध सामान्य राहतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Green Lucky Number: 2
advertisement
2/12
वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक मोठे खर्च होऊ शकतात. त्यामुळे तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमचा हक्क मिळवण्यासाठी तुमच्या प्रियजनांसोबत संघर्ष करावा लागू शकतो. शक्य असल्यास वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित किंवा इतर कोणतीही जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद कोर्टापर्यंत न नेता वाटाघाटींद्वारे सोडवा. या आठवड्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबत भ्रमनिरास होऊ शकतो. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी मेहनत हाच शेवटचा पर्याय आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. व्यावसायिकांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध खूप शुभ असेल. या काळात तुम्ही मार्केटमधील तेजीचा फायदा घेऊ शकाल आणि मार्केटमध्ये तुमची पत निर्माण होईल. या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. आईच्या तब्येतीची थोडी चिंता राहील.Lucky Color: Gray
Lucky Number: 10
वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक मोठे खर्च होऊ शकतात. त्यामुळे तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमचा हक्क मिळवण्यासाठी तुमच्या प्रियजनांसोबत संघर्ष करावा लागू शकतो. शक्य असल्यास वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित किंवा इतर कोणतीही जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद कोर्टापर्यंत न नेता वाटाघाटींद्वारे सोडवा. या आठवड्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबत भ्रमनिरास होऊ शकतो. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी मेहनत हाच शेवटचा पर्याय आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. व्यावसायिकांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध खूप शुभ असेल. या काळात तुम्ही मार्केटमधील तेजीचा फायदा घेऊ शकाल आणि मार्केटमध्ये तुमची पत निर्माण होईल. या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. आईच्या तब्येतीची थोडी चिंता राहील.Lucky Color: Gray Lucky Number: 10
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कोणालाही उत्तर देताना किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल. या आठवड्यात निर्णय घेताना झालेली छोटीशी चूक तुमच्यासाठी मोठ्या पश्चातापाचे कारण बनू शकते. या आठवड्यात इतरांशी आणि घरातील एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद घालू नका. घर, कुटुंब किंवा कामाशी संबंधित बाबींमध्ये वरिष्ठांचा सल्ला गांभीर्याने ऐका. जर त्यांचा सल्ला आपल्या अनुकूल नसेल तर अत्यंत आदराने आपली असहमती दर्शवा. एखाद्या वादग्रस्त विषयावरील छोटीशी चर्चा तुम्हाला अडचणीत आणू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला जीवनाशी संबंधित सर्व समस्यांवर उपाय दिसतील. या काळात तुम्हाला तुमच्या जवळचे मित्र आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवून खर्च करावा लागेल. प्रेम संबंध सामान्य असतील.Lucky Color: Yellow
Lucky Number: 5
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कोणालाही उत्तर देताना किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल. या आठवड्यात निर्णय घेताना झालेली छोटीशी चूक तुमच्यासाठी मोठ्या पश्चातापाचे कारण बनू शकते. या आठवड्यात इतरांशी आणि घरातील एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद घालू नका. घर, कुटुंब किंवा कामाशी संबंधित बाबींमध्ये वरिष्ठांचा सल्ला गांभीर्याने ऐका. जर त्यांचा सल्ला आपल्या अनुकूल नसेल तर अत्यंत आदराने आपली असहमती दर्शवा. एखाद्या वादग्रस्त विषयावरील छोटीशी चर्चा तुम्हाला अडचणीत आणू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला जीवनाशी संबंधित सर्व समस्यांवर उपाय दिसतील. या काळात तुम्हाला तुमच्या जवळचे मित्र आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवून खर्च करावा लागेल. प्रेम संबंध सामान्य असतील.Lucky Color: Yellow Lucky Number: 5
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नियोजित काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास थोडं वाईट वाटेल. इच्छित नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणखी थोडी वाट बघावी लागू शकते. नोकरदारांनी ऑफिसमधील कामात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही मिश्रण करावं. परीक्षा आणि स्पर्धांशी संबंधित विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करूनच अपेक्षित यश मिळेल. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध थोडा चांगला जाईल. या काळात सत्ता आणि सरकारशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात प्रभावशाली व्यक्तींची मदत मदत होईल. वडिलधाऱ्यांच्या किंवा हितचिंतकांच्या मतांकडे दुर्लक्ष करू नका. बिझनेसमधील व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमचा आधार असेल.Lucky Color: Pink
Lucky Number: 3
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नियोजित काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास थोडं वाईट वाटेल. इच्छित नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणखी थोडी वाट बघावी लागू शकते. नोकरदारांनी ऑफिसमधील कामात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही मिश्रण करावं. परीक्षा आणि स्पर्धांशी संबंधित विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करूनच अपेक्षित यश मिळेल. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध थोडा चांगला जाईल. या काळात सत्ता आणि सरकारशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात प्रभावशाली व्यक्तींची मदत मदत होईल. वडिलधाऱ्यांच्या किंवा हितचिंतकांच्या मतांकडे दुर्लक्ष करू नका. बिझनेसमधील व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमचा आधार असेल.Lucky Color: Pink Lucky Number: 3
advertisement
5/12
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील. जीवनातील कोणत्याही मोठ्या अडचणीवर बुद्धी आणि हुशारीने तुम्ही मात कराल. यामुळे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन किंवा मालमत्ता खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल. या डीलमध्ये तुम्हाला अपेक्षित फायदेही मिळतील. नोकरीत वरिष्ठांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारीही मिळू शकते. तुम्हाला अपेक्षित प्रमोशन किंवा ट्रान्सफर मिळू शकते. कमिशन किंवा कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये विशेष लाभ मिळेल. तुम्ही मार्केटमध्ये वर्चस्व गाजवाल. आरोग्य सामान्य राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color: Orange
Lucky Number: 11
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील. जीवनातील कोणत्याही मोठ्या अडचणीवर बुद्धी आणि हुशारीने तुम्ही मात कराल. यामुळे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन किंवा मालमत्ता खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल. या डीलमध्ये तुम्हाला अपेक्षित फायदेही मिळतील. नोकरीत वरिष्ठांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारीही मिळू शकते. तुम्हाला अपेक्षित प्रमोशन किंवा ट्रान्सफर मिळू शकते. कमिशन किंवा कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये विशेष लाभ मिळेल. तुम्ही मार्केटमध्ये वर्चस्व गाजवाल. आरोग्य सामान्य राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color: Orange Lucky Number: 11
advertisement
6/12
कन्या (Virgo) : या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील प्रमुख चिंता दूर होतील. आठवड्याच्या सुरुवातीला जवळच्या मित्राच्या किंवा हितचिंतकांच्या मदतीने कुटुंबातील किंवा व्यवसायातील प्रमुख समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बिझनेसशी संबंधित ज्या लोकांचे पैसे मार्केटमध्ये अडकले असतील त्यांना या आठवड्यात मोठं यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळू शकतात. कोणत्याही नवीन प्रकल्पात विचारपूर्वक पैसे गुंतवा. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Purple
Lucky Number: 6
कन्या (Virgo) : या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील प्रमुख चिंता दूर होतील. आठवड्याच्या सुरुवातीला जवळच्या मित्राच्या किंवा हितचिंतकांच्या मदतीने कुटुंबातील किंवा व्यवसायातील प्रमुख समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बिझनेसशी संबंधित ज्या लोकांचे पैसे मार्केटमध्ये अडकले असतील त्यांना या आठवड्यात मोठं यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळू शकतात. कोणत्याही नवीन प्रकल्पात विचारपूर्वक पैसे गुंतवा. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Purple Lucky Number: 6
advertisement
7/12
तूळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा अधिक शुभ आणि लाभदायक असेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादं काम अडकलेलं असेल तर या आठवड्यात त्यात अपेक्षित यश मिळेल. या आठवड्यात तुम्हाला अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवणे आणि आळशीपणा करणे टाळावं लागेल. नाहीतर यश हातातून निसटू शकते. नोकरदार महिलांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध खूप शुभ असेल. या काळात चांगल्या कामगिरीमुळे ऑफिसमध्ये आणि कुटुंबातही त्यांचा आदर वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागेल. तुमचा बराचसा वेळ धार्मिक कार्यात जाईल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. सिंगल लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती प्रवेश करू शकते. आधीपासून असलेले प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: White
Lucky Number: 9
तूळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा अधिक शुभ आणि लाभदायक असेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादं काम अडकलेलं असेल तर या आठवड्यात त्यात अपेक्षित यश मिळेल. या आठवड्यात तुम्हाला अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवणे आणि आळशीपणा करणे टाळावं लागेल. नाहीतर यश हातातून निसटू शकते. नोकरदार महिलांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध खूप शुभ असेल. या काळात चांगल्या कामगिरीमुळे ऑफिसमध्ये आणि कुटुंबातही त्यांचा आदर वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागेल. तुमचा बराचसा वेळ धार्मिक कार्यात जाईल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. सिंगल लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती प्रवेश करू शकते. आधीपासून असलेले प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: White Lucky Number: 9
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात त्यांचा वेळ आणि ऊर्जा काळजीपूर्वक मॅनेज करावी लागेल. तुम्हाला तुमची महत्त्वाची कामं इतरांच्या हातात देणं टाळावं लागेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागेल. एखाद्याला पैसे उसने देताना व्यवस्थित विचार करा नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. नोकरदारांना आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक कामाचा बोजा सहन करावा लागू शकतो. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना अपेक्षित यश मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात ऋतू बदलातील आजार किंवा काही जुनाट आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची आणि दैनंदिन दिनचर्येची खूप काळजी घ्या. प्रेम संबंध सामान्य असतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Golden
Lucky Number: 1
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात त्यांचा वेळ आणि ऊर्जा काळजीपूर्वक मॅनेज करावी लागेल. तुम्हाला तुमची महत्त्वाची कामं इतरांच्या हातात देणं टाळावं लागेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागेल. एखाद्याला पैसे उसने देताना व्यवस्थित विचार करा नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. नोकरदारांना आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक कामाचा बोजा सहन करावा लागू शकतो. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना अपेक्षित यश मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात ऋतू बदलातील आजार किंवा काही जुनाट आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची आणि दैनंदिन दिनचर्येची खूप काळजी घ्या. प्रेम संबंध सामान्य असतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Golden Lucky Number: 1
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : धनु राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सुख आणि सौभाग्य देईल. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आणि घरात आनंदाचं वातावरण असेल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाबद्दल तुमचा सन्मान होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांचा मार्केटमध्ये प्रभाव वाढेल आणि इच्छित नफा मिळविण्यात ते यशस्वी होतील. या आठवड्यात तुमच्याकडे भरपूर ऊर्जा असेल आणि तुमच्या बुद्धीच्या मदतीने तुम्ही मोठ्या समस्याही अगदी सहज सोडवू शकाल. गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ पूजेत जाईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे योग येतील. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. एखाद्याशी असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकतं.Lucky Color: Maroon
Lucky Number: 14
धनू (Sagittarius) : धनु राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सुख आणि सौभाग्य देईल. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आणि घरात आनंदाचं वातावरण असेल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाबद्दल तुमचा सन्मान होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांचा मार्केटमध्ये प्रभाव वाढेल आणि इच्छित नफा मिळविण्यात ते यशस्वी होतील. या आठवड्यात तुमच्याकडे भरपूर ऊर्जा असेल आणि तुमच्या बुद्धीच्या मदतीने तुम्ही मोठ्या समस्याही अगदी सहज सोडवू शकाल. गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ पूजेत जाईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे योग येतील. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. एखाद्याशी असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकतं.Lucky Color: Maroon Lucky Number: 14
advertisement
10/12
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींनी आत्ताच्या किरकोळ नफ्यासाठी दीर्घकालीन तोटा करून घेऊ नये. कामावर असो किंवा घरी तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर खोटं बोलण्याऐवजी ती स्वीकारा. नाहीतर ती उघड झाल्यास तुम्हाला अधिक खजिल झाल्यासारखे वाटेल. जमीन किंवा इमारतींबाबत वाद सुरू असेल तर तो कोर्टात नेण्याऐवजी वाटाघाटीद्वारे सोडवणे योग्य ठरेल. तुम्ही व्यावसायिक असाल तर घाईगडबडीत किंवा संभ्रमावस्थेत कोणताही निर्णय घेणं टाळा. नाहीतर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचं काम किंवा व्यवसायातून वेळ काढून तो कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. लहान-मोठ्या वादासह प्रेम संबंध सामान्य राहतील. ऋतू बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा.Lucky Color: Violet
Lucky Number: 7
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींनी आत्ताच्या किरकोळ नफ्यासाठी दीर्घकालीन तोटा करून घेऊ नये. कामावर असो किंवा घरी तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर खोटं बोलण्याऐवजी ती स्वीकारा. नाहीतर ती उघड झाल्यास तुम्हाला अधिक खजिल झाल्यासारखे वाटेल. जमीन किंवा इमारतींबाबत वाद सुरू असेल तर तो कोर्टात नेण्याऐवजी वाटाघाटीद्वारे सोडवणे योग्य ठरेल. तुम्ही व्यावसायिक असाल तर घाईगडबडीत किंवा संभ्रमावस्थेत कोणताही निर्णय घेणं टाळा. नाहीतर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचं काम किंवा व्यवसायातून वेळ काढून तो कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. लहान-मोठ्या वादासह प्रेम संबंध सामान्य राहतील. ऋतू बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा.Lucky Color: Violet Lucky Number: 7
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशीबाची साथ मिळेल. तुमच्या जवळच्या मित्रांच्या मदतीने तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. विशेष म्हणजे हे करताना तुम्हाला काही प्रभावशाली व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना या काळात मोठी पदं किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. करिअर किंवा व्यवसायासाठी आठवड्याच्या उत्तरार्धात केलेला कोणताही प्रवास आनंददायी आणि अत्यंत यशस्वी होईल. तुमच्याकडून कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या अपेक्षा वाढतील. जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचं लग्नात रुपांतर करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Silver
Lucky Number: 4
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशीबाची साथ मिळेल. तुमच्या जवळच्या मित्रांच्या मदतीने तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. विशेष म्हणजे हे करताना तुम्हाला काही प्रभावशाली व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना या काळात मोठी पदं किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. करिअर किंवा व्यवसायासाठी आठवड्याच्या उत्तरार्धात केलेला कोणताही प्रवास आनंददायी आणि अत्यंत यशस्वी होईल. तुमच्याकडून कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या अपेक्षा वाढतील. जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचं लग्नात रुपांतर करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Silver Lucky Number: 4
advertisement
12/12
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्यपूर्ण असेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमच्या नशीबाचा प्रभाव दिसेल. यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश आणि नफा मिळेल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या ठिकाणाहून ऑफर मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक केली असेल तर या आठवड्यात त्यातून बक्कळ नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात जाईल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगलं जुळवून घ्याल. जोडीदारासोबत रमणीय ठिकाणी फिरायला जाणे शक्य होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Brown
Lucky Number: 12
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्यपूर्ण असेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमच्या नशीबाचा प्रभाव दिसेल. यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश आणि नफा मिळेल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या ठिकाणाहून ऑफर मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक केली असेल तर या आठवड्यात त्यातून बक्कळ नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात जाईल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगलं जुळवून घ्याल. जोडीदारासोबत रमणीय ठिकाणी फिरायला जाणे शक्य होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Brown Lucky Number: 12
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement