बाथरूममधील रिकामी बादली ठरते अशुभ!
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादलीसुद्धा वास्तुदोषाचं कारण बनू शकते. अनेकदा लोक आंघोळ झाल्यावर बादली रिकामीच ठेवतात. पण रोज होणारी ही चूक तुम्हाला मोठं नुकसान पोहोचवू शकते. कारण यामुळे तुमच्या आनंदी कुटुंबाला समस्या घेरतील आणि तुम्हाला त्याची जाणीवही होणार नाही. चला तर मग ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार डॉ. अरविंद पाचोली यांच्याकडून बाथरूमशी संबंधित काही वास्तू टिप्स जाणून घेऊया...
advertisement
बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने होतं आर्थिक नुकसान
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने गरिबी येते. यामुळे घरात पैशाच्या आगमनात अडथळे येतात आणि आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. हे दर्शवते की तुमची ऊर्जा पैसा जमा करण्यात नव्हे, तर अनावश्यक खर्चात खर्च होत आहे.
आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम
आरोग्य केवळ अन्न आणि दिनचर्येमुळेच नाही, तर आजूबाजूच्या वातावरणामुळेही प्रभावित होतं. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने आजार येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार या सवयीमुळे घरात इन्फेक्शन, थकवा आणि वारंवार आजारी पडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
हे ही वाचा : Monday Born People: सोमवारचा जन्म? एका जागेवर, एका कामावर स्थिर राहणार कसे; नशीब उजळायला..
हे ही वाचा : काही झालं तरी या 5 लोकांच्या मृतदेहांचं काशीत दहन होत नाही, स्मशानातून परत जातात डेडबॉडी