Monday Born People: सोमवारचा जन्म? एका जागेवर, एका कामावर स्थिर राहणार कसे; नशीब उजळायला..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Monday Born People: सोमवार चंद्राचा दिवस मानला जातो. सोमवारी जन्मलेल्या लोकांवर चंद्राचा मोठा प्रभाव असतो. ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म होतो, त्या दिवसाचा स्वामी ग्रह त्याच्या जीवनावर आणि स्वभावावर परिणाम करतो.
मुंबई : रविवारच्या सरकारी सुट्टीनंतर सोमवार हा प्रत्येकासाठी कामाचा दिवस असतो. सोमवार चंद्राचा दिवस मानला जातो. सोमवारी जन्मलेल्या लोकांवर चंद्राचा मोठा प्रभाव असतो. ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म होतो, त्या दिवसाचा स्वामी ग्रह त्याच्या जीवनावर आणि स्वभावावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मदिवसाचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभाव, विचारसरणी, नातेसंबंध आणि यश-अपयशाशी संबंधित असतो. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांनी सोमवारी जन्मलेल्या लोकांबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.
सोमवारी जन्मलेल्या लोकांवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थितीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे सोमवारी जन्मलेले लोक खूप भावनिक, संवेदनशील आणि कल्पनाशील असतात. त्यांचा स्वभाव सहसा शांत असतो पण त्यांचा मूड सारखा-सारखा बदलतो. हे लोक मित्र-कुटुंबाबद्दल खूप भावनिक असतात, नाते संबंध टिकवून ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करतात.
advertisement
लग्नानंतर उजळते नशीब - ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, सोमवारी जन्मलेल्या लोकांचे भाग्य लग्नानंतर उजळते. म्हणजेच लग्न त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. मात्र, नातेसंबंधांबद्दल थोडे सावधही असले पाहिजे, कारण भावनेच्या भरात निर्णय घेणे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
जीवनातील शुभ कार्यांची सुरुवात - सोमवारी जन्मलेल्या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार शुभ असतात, असे ज्योतिषी मानतात. या दिवसांमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरीत रुजू होणे, वाहन खरेदी करणे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. वरील दिवसांमध्ये कोणतेही नवीन काम हाती घेतले तर यश मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
advertisement
खबरदारीच्या गोष्टी - या लोकांनी रात्री झोपताना उशाजवळ मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट ठेवू नयेत, शिळे अन्न खाणे टाळावे. सोमवारी जन्मलेल्या लोकांनी शनिवारी कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि शनि एकत्र येतात तेव्हा ते मिलन विष योग निर्माण करतात, ज्यामुळे मानसिक त्रास आणि अस्थिरता निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्या लोकांचा मूलांक, भाग्यांक 8 आहे त्यांच्यासाठी हे संयोजन आणखी समस्या निर्माण करू शकते.
advertisement
आकर्षक व्यक्तिमत्व पण - अशा लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, शिवाय ते समाजात चर्चेचा विषय बनतात. मित्र परिवार चांगला असतो, परंतु हे लोक मनाने अनेकदा गोंधळलेले असतात. या लोकांचे कौटुंबिक जीवन चांगले असते. भाऊ-बहिणींचा सहवास घर आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद असतो. पण कधीकधी त्यांना योग्य वेळी आवश्यक असलेला पाठिंबा मिळत नाही.
advertisement
आरोग्याशी संबंधित खबरदारी - या लोकांना अनेकदा गॅस, पोटदुखी आणि वातावरण बदलाशी संबंधित आजारांचा त्रास होतो. त्यांनी त्यांचा दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवावा आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 13, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Monday Born People: सोमवारचा जन्म? एका जागेवर, एका कामावर स्थिर राहणार कसे; नशीब उजळायला..










