काळ्या रंगाच्या कपड्यांपासून दूर राहा
वसंत पंचमीला 'पिवळ्या' रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रंग ऊर्जा, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी चुकूनही काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. पूजेच्या वेळी पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करणे सर्वोत्तम असते, कारण हे रंग देवीला प्रिय आहेत.
advertisement
पुस्तकांचा अनादर
माता सरस्वती ही साक्षात विद्येचे रूप आहे. या दिवशी आपण आपल्या अभ्यासाच्या साहित्याची पूजा करतो. पुस्तकांना पाय लावणे, ती अस्ताव्यस्त टाकणे किंवा पुस्तकांवर बसणे यांसारख्या गोष्टी टाळा. आजच्या दिवशी पेन किंवा पेन्सिल फेकून देणे किंवा त्यांचा अपमान करणे 'विद्या दोषा'ला निमंत्रण देऊ शकते.
वाणीवर ताबा आणि कठोर शब्द
देवी सरस्वती ही वाणीची देवता आहे. असे मानले जाते की, वसंत पंचमीच्या दिवशी देवी प्रत्येकाच्या जिभेवर एकदा तरी विराजमान होते. आजच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, खोटे बोलू नका किंवा अपशब्द वापरू नका. कोणाचेही मन दुखावेल असे बोलल्याने देवी सरस्वती नाराज होते.
तामसिक भोजन आणि व्यसने
हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे खानपानाचे नियम पाळणे गरजेचे आहे. वसंत पंचमीला मांसाहार, मद्यपान किंवा लसूण-कांद्याचा वापर टाळावा. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे सात्त्विक अन्न ग्रहण करावे.
झाडे-झुडपे तोडणे टाळा
वसंत ऋतू हा निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा काळ आहे. या दिवशी घरातील किंवा बाहेरील झाडे कापणे, पाने तोडणे किंवा फुलांचे नुकसान करणे अशुभ मानले जाते. निसर्गाचा अपमान म्हणजे निसर्गदेवतेचा अपमान समजला जातो.
अस्वच्छता आणि उशिरा उठणे
ब्रह्ममुहूर्तावर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी अंघोळ न करता काहीही खाऊ नका. तसेच घरामध्ये किंवा पूजास्थळी अस्वच्छता ठेवू नका. अस्वच्छ ठिकाणी देवीचा वास नसतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
