TRENDING:

नवरा-बायकोचं बेडरूम कसं असावं? वास्तूशास्त्रात दिले आहेत खास नियम

Last Updated:

वास्तूदोष निर्माण झाल्यास असह्य अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यातली शांतता हरवतेच, शिवाय हातात पैसा टिकत नाही, आरोग्यही साथ देत नाही, असं वास्तूशास्त्र सांगतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परमजीत कुमार, प्रतिनिधी
संसार उत्तम व्हावा असं वाटत असेल, तर...
संसार उत्तम व्हावा असं वाटत असेल, तर...
advertisement

देवघर : ज्योतिषशास्त्रात जसं ग्रह-ताऱ्यांना विशेष महत्त्व आहे, तसंच अनन्यसाधारण महत्त्व वास्तूशास्त्रात आपल्या भोवतालच्या प्रत्येक वस्तूला आहे. वास्तूशास्त्र सांगतं की, आपल्या आजूबाजूच्या वस्तू, त्यांची स्थिती, दिशा, रंग यांचा चांगला-वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. विशेषतः घरातल्या बेडरूममधल्या वस्तूंचा, भिंतींचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो. सुखी संसारासाठी वास्तूशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत. त्यानुसार नवरा-बायकोचं बेडरूम कसं असावं, जाणून घेऊया.

advertisement

झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, आपल्या आयुष्यात वास्तूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वास्तूदोष निर्माण झाल्यास असह्य अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यातली शांतता हरवतेच, शिवाय हातात पैसा टिकत नाही, आरोग्यही साथ देत नाही. संसार उत्तम व्हावा असं वाटत असेल, तर बेडरूमची रचना सुव्यवस्थित असायलाच हवी, म्हणजे नेमकी कशी, पाहूया.

advertisement

हेही वाचा : 6 जून! तारीख लक्षात ठेवा, 4 राशींच्या व्यक्तींचं याच दिवशी प्रमोशन होण्याची शक्यता

1. बेड कोणत्या दिशेत असावं?

दिवसभर थकून रात्री आपण ज्या बेडवर निवांत विश्रांती घेता, ते बेड कायम योग्य दिशेतच असायला हवं. दक्षिण-पश्चिम दिशेत बेड असेल तर उत्तम. शिवाय त्यावर झोपल्यावर तुमचं डोकं पूर्व किंवा दक्षिण दिशेत असायला हवं आणि पाय पश्चिम किंवा उत्तर दिशेत असायला हवे. परंतु चुकूनही पश्चिम किंवा उत्तर दिशेकडे डोकं ठेवून झोपू नये. नाहीतर वैवाहिक जीवनात प्रचंड अडचणी निर्माण होतात, विशेषतः आपल्याला भयंकर शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो.

advertisement

2. आरसा कुठे असावा?

बेडरूममधल्या आरशाची सावली कधीच तुमच्या पोटावर पडायला नको. झोपल्यावर तुम्ही स्वतःला आरशात दिसायला नको. अशा पद्धतीनंच बेडरूममध्ये आरसा लावा. नाहीतर मूल होण्यात अडचणी येतात, असं वास्तूशास्त्र सांगतं.

3. लाईट्सवरही लक्ष द्या

प्रकाशाचा प्रभाव कायम आपल्या आयुष्यावर पडत असतो, त्यामुळे बेडरूममधल्या लाईट्सवर विशेष लक्ष द्यावं. जर इथं हलक्या प्रकाशाच्या लाईट्स असतील, तर वैवाहिक जीवनातला गोडवा कायम राहतो.

advertisement

4. बेडरूमच्या भिंतींचा रंग

आपल्या घरातील भिंतींच्या रंगाचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. बेडरूमधील भिंतींचा रंग हलका गुलाबी, भूरकट किंवा पिवळा असेल तर वैवाहिक जीवनात गोडवा येतो. याउलट जर या भिंतींचा रंग गडद असेल तर संसारात शांतता टिकत नाही. नवरा-बायकोमध्ये कायम खटके उडतात.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरा-बायकोचं बेडरूम कसं असावं? वास्तूशास्त्रात दिले आहेत खास नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल