6 जून! तारीख लक्षात ठेवा, 4 राशींच्या व्यक्तींचं याच दिवशी प्रमोशन होण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर आपलं भविष्य, आपला भूतकाळ आणि वर्तमानकाळ ठरत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर एखाद्या विशिष्ट राशीत प्रवेश करतो. ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. 1 मे रोजी गुरू ग्रहाचा मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश झाला. 7 मे रोजी इथंच गुरूचा अस्त झाला. आता येत्या 6 जून रोजी गुरू ग्रहाचा वृषभ राशीतच उदय होणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींना बक्कळ फायदा होईल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जूनला गुरू ग्रह वृषभ राशीत उदय होईल. खरंतर गुरू ग्रहाचा जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होतो तेव्हा त्याच राशीत तो अस्त होऊन उदय होतो. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. विशेषतः जेव्हा गुरू ग्रहाचा उदय होतो, तेव्हा काही राशींचं भाग्य अक्षरश: उजळून निघतं. सध्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक : आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, त्या क्षेत्रात आपल्याला भरभरून यश मिळेल. बऱ्याच काळापासून जे काम मनात असेल, ते आता पूर्ण होऊ शकतं, शिवाय आरोग्यही उत्तम साथ देईल.
advertisement