मध्यरात्री 3-4 वाजता येत असेल अचानक जाग, तर करायला हवं एकच काम; आयुष्य होईल सुंदर!

Last Updated:

सतत अचानक जाग येत असेल तर हा निद्रानाशाचा आजार असू शकतो. अशा परिस्थितीत वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणं फायद्याचं ठरेल. जर त्यात आरोग्याबाबत कोणतीही समस्या आढळली नाही, तर समजून जायचं की...

(हा फोटो काल्पनिक आहे. सौजन्य : Canva)
(हा फोटो काल्पनिक आहे. सौजन्य : Canva)
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : अनेकदा आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच मध्यरात्री 3-4 वाजताच्या सुमारास अचानक झोपेतून जाग येते. मग त्यासाठी कोणत्याही अलार्मची गरज नसते. तुमच्यासोबतही असं होत असेल, तर कदाचित ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं कारण यामागे असू शकतं. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ज्योतिषांनी सांगितलं की, मध्यरात्री 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यानची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. या वेळेला म्हणतात 'ब्रह्म मुहूर्त'. यावेळी अनेक शक्ती तुमच्याशी संपर्क करू इच्छितात. शिवाय निसर्गाचा हा एक सुवर्ण संदेश असतो. जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर जाग येत असेल, तर उठून तुम्ही त्या वेळेचा लाभ घ्यायला हवा. कारण दिवसभरातील कोणत्याही वेळेपेक्षा या वेळी सर्वत्र सकारात्मक ऊर्जा प्रचंड असते. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करू शकता.
advertisement
ज्योतिषांनी पुढे सांगितलं की, ब्रह्म मुहूर्तावर जाग आल्यास त्यावेळी केलेली प्रार्थना किंवा कोणत्याही कामाचं फळ 5 पटीने जास्त मिळतं. जर त्यावेळी नेमकं काय करावं हे तुम्हाला कळत नसेल, तर फक्त देवाचं नामस्मरण करावं. त्यामुळेसुद्धा आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
advertisement
दरम्यान, ज्योतिषांनी असंही सांगितलं की, सतत ब्रह्म मुहूर्तावर अचानक जाग येत असेल तर हा निद्रानाशाचा आजारही असू शकतो. अशा परिस्थितीत वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणं फायद्याचं ठरेल. जर त्यात आरोग्याबाबत कोणतीही समस्या आढळली नाही, तर समजून जायचं की निसर्गातील सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्याला भेटू इच्छितात, त्यामुळे त्यांचा वापर करून आपलं आयुष्य यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
मध्यरात्री 3-4 वाजता येत असेल अचानक जाग, तर करायला हवं एकच काम; आयुष्य होईल सुंदर!
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement