मंगळ दोष कायम वाईटच नसतो, व्यक्तीला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवू शकतो!

Last Updated:

मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. कारण त्याची स्थिती जर कुंडलीत चांगली असेल तर व्यक्तीला भरपूर सुख मिळतं आणि त्याची स्थिती वाईट असेल, तर व्यक्तीच्या आयुष्याची स्थितीही वाईटच होते.

मंगळाचा सर्वाधिक विपरीत परिणाम हा वैवाहिक जीवनावरच होतो.
मंगळाचा सर्वाधिक विपरीत परिणाम हा वैवाहिक जीवनावरच होतो.
विक्रम झा, प्रतिनिधी
पूर्णिया : असं म्हणतात की, पत्रिकेत कुंडली दोष असेल तर लग्न उशिरा होतं, शिवाय वैवाहिक जीवनात अडचणी येतात. म्हणूनच लग्न जुळवताना पत्रिकेत मंगळ दोष असल्यास त्यावर उपाय केले जातात. परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की, मंगळ दोष कायम वाईटच असतो असं नाहीये, तर कधीकधी याच दोषामुळे व्यक्तीची भरभराट होते.
बिहारमधील पूर्णियाचे ज्योतिषी पंडित मनोत्पल झा सांगतात की, मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. शिवाय हा उग्र ग्रह मानला जातो. कारण त्याची स्थिती जर कुंडलीत चांगली असेल तर व्यक्तीला भरपूर सुख मिळतं आणि त्याची स्थिती वाईट असेल, तर व्यक्तीच्या आयुष्याची स्थितीही वाईटच होते. मंगळाचा सर्वाधिक विपरीत परिणाम हा वैवाहिक जीवनावरच होतो.
advertisement
ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो, त्यांचं मूळातच लग्न जुळत नाही. लग्न जुळण्यात भरपूर अडथळे येतात आणि जरी लग्न झालंच तरी ती व्यक्ती कधीच सुख राहत नाहीत. म्हणूनच ज्योतिषी सांगतात की, लग्नाआधी वधू-वराची पत्रिका जुळवून पाहावी. कारण मंगळ दोष असेल तर त्यावर उपाय करता येतो. परंतु लग्नाशिवाय इतर बाबतीत हे लोक अत्यंत नशीबवान असतात, ते बुद्धिमान असतात, करियरमध्ये त्यांना प्रचंड यश मिळतं. परंतु पैशांच्या बाबतीत मात्र हे लोक अडचणीत येतात. कर्जबाजारीपणा, जमिनीचे वाद त्यांच्या पाठीशी लागतात. शिवाय विविध आजार जडल्यानं त्यांचं आयुष्यही कमी होतं.
advertisement
दरम्यान, कुंडलीतील मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी उपवास पाळण्याचा आणि मारुती मंदिरात बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय मंगळवारी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचं पठण करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करून मारुती मंदिरात कुंकू वाहावं असं ज्योतिषी सांगतात.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
मंगळ दोष कायम वाईटच नसतो, व्यक्तीला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवू शकतो!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement