ज्योतिषीय गणितानुसार, शुक्र आपलं नक्षत्र बदलणार आहे. याचा काही राशींवर शुभ परिणाम होईल, तर काही राशींवर अशुभ. पण आजच्या या बातमीत आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे सावध राहावं लागणार आहे.
अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतिषीय गणितानुसार 26 जून रोजी शुक्र सूर्याच्या प्रभावी कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींना सावध राहावं लागणार आहे. तर काही राशींना अनेक प्रकारच्या चांगल्या बातम्या मिळू शकतात. अशा परिस्थितीत, शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.
advertisement
कन्या : शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कन्या राशीच्या लोकांनी आपल्या वैयक्तिक जीवनात संयम आणि सावधगिरी बाळगावी. त्यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. तुमची प्रतिष्ठा दुखावली जाऊ शकते. वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
तूळ : तूळ राशीच्या लोकांना अनेक प्रकारची खबरदारी घ्यावी लागेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अपयश येऊ शकतं. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अडचणीचा असेल. तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. शत्रू तुमच्या चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. कामाच्या ठिकाणी आपली चालू असलेली जबाबदारी अपूर्ण सोडणं हानिकारक ठरेल. वैवाहिक जीवनातही अनेक प्रकारच्या समस्या येतील.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होईल. समाजात बोललेल्या गोष्टींचा लोक गैरसमज करून घेऊ शकतात. तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला विचारपूर्वक बोलावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहू शकते.
हे ही वाचा : घरातली तुळस 'हे' संकेत देत असेल, तर समजा लक्ष्मीची कृपा होणार आणि तुम्ही श्रीमंत होणार!
हे ही वाचा : प्रत्येक वेळी अपयश येतंय? तुमच्या कुंडलीत असू शकतो 'कालसर्प योग'; उज्जैनच्या आचार्यांनी सांगितले 'हे' सोपे उपाय
