भाविकांसाठी खास सोयी-सुविधा : भाविकांच्या सोयीसाठी सप्तशृंगगडावरील ट्रस्टने विशेष व्यवस्था केली आहे.
- स्वच्छता आणि सोयी: संपूर्ण मंदिर आणि परिसरात स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. मोफत महाप्रसादासाठी 'अन्नपूर्णा प्रसादालय', मोबाईल टॉयलेट आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय करण्यात आली आहे.
- सुरक्षा: गडावर सुमारे 100 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
- आरोग्य सेवा: भाविकांसाठी 10 आरोग्य तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
- व्हीआयपी पास: गर्दी नियंत्रित करण्यासाठी व्हीआयपी पासची संख्या 500 वरून 300 वर आणण्यात आली आहे.
- सुरक्षा दल: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, 10 उपनिरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी, 40 आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, 40 सरकारी सुरक्षा कर्मचारी आणि 100 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
संपूर्ण गड परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. भाविकांना सुलभ दर्शन आणि सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठ सप्तशृंगी गडाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारच्या प्रवासाच्या आणि निवासाच्या सोयी उपलब्ध आहेत. गडाला रेल्वे, बस आणि विमान मार्गाने सहज पोहोचता येते.
प्रवासाची साधने
- रेल्वे : गडापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे. मुंबई, पुणे, भुसावळ, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतून थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नाशिक रोडहून पुढे वणीला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी सहज मिळतात.
- राज्य परिवहन बस (MSRTC) : राज्य परिवहन महामंडळाच्या बस थेट सप्तशृंगीगडापर्यंत जातात. नाशिकहून दिंडोरी मार्गे वणी सप्तशृंगीगड हा रस्ता सुमारे 60-70 किमीचा आहे. मुंबई (260-280 किमी) किंवा पुणे (300 किमी) येथूनही नाशिकमार्गे वणीला जाता येते.
- विमान : गडाच्या सर्वात जवळचे विमानतळ नाशिकमधील ओझर एअरपोर्ट (50-55 किमी) आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरून येत असाल तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात जवळचे आहे (270 किमी). विमानतळावरून वणीला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसची सोय आहे.
advertisement
advertisement
निवास व्यवस्था
- श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट : गडावर किंवा वणीमध्ये ट्रस्टच्या धर्मशाळा आणि यात्रेकरू निवास उपलब्ध आहेत. इथे साध्या खोल्या आणि डॉर्मिटरी स्वरूपातील राहण्याची सोय असते. एका रात्रीसाठी साधारणपणे ₹300 ते ₹600 पर्यंत खर्च येतो.
- खाजगी हॉटेल्स/लॉज : वणीच्या बाजारात, गडाच्या पायथ्याशी आणि नाशिक रोड परिसरात अनेक खाजगी हॉटेल्स आणि लॉज आहेत.
- नॉन-एसी खोल्यांसाठी एका रात्रीचा खर्च साधारण ₹800 ते ₹1500 पर्यंत असतो.
- एसी खोल्यांसाठी हा खर्च ₹1500 ते ₹2500 पर्यंत असू शकतो.
- नाशिक शहर : जर तुम्हाला गडावर न थांबता नाशिक शहरात राहायचे असेल, तर तिथे तुम्हाला ₹100 ते ₹5000 पर्यंतच्या दरात अनेक चांगली हॉटेल्स उपलब्ध आहेत.
हे ही वाचा : Navratri 2025: कर्णपुऱ्यातील तुळजाभवानीच्या दर्शन वेळेत मोठा बदल, भाविकांसाठी विशेष निर्णय
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 2:14 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri Special : देवीच्या दर्शनासाठी यायचंय? सप्तशृंगगडावर भाविकांसाठी यंदा खास व्यवस्था, वाचा कसं आहे नियोजन!