नर्मदापुरम : लहान असो किंवा मोठा असो, साप दिसला की आपली भंबेरी उडतेच. आपण डोळ्यासमोर दिसणाऱ्या सापाला जेवढं घाबरतो, तेवढंच आपल्या कुंडलीतल्या सर्पदोषाला घाबरणंही महत्त्वाचं आहे. कारण ज्योतिषशास्त्रात 'कालसर्प दोष' हा अत्यंत अशुभ दोष मानला जातो. असं म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, त्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
या दोषाचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर होतोच, मात्र व्यक्तीची मानसिक स्थितीदेखील यामुळे बिघडते. म्हणूनच कालसर्प दोषावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. आज आपण यावर एक रामबाण उपाय पाहणार आहोत. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी केली जाते. या दिवशी नर्मदा देवीची मनोभावे पूजा करतात, त्यामुळे विविध दोषांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं. हिंदू धर्मात सात नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, नर्मदा नदी ही त्यापैकीच एक.
Snake News - अचानक साप समोर आला तर काय करायचं? पळायचं, मारायचं तर बिलकुल नाही; सर्वात आधी...
नर्मदेत आंघोळ करण्याचे फायदे
शास्त्रांनुसार, गंगेत आंघोळ केल्याने जसे सर्व पाप धुवून निघतात, त्याचप्रमाणे नर्मदा नदीत आंघोळ करणंदेखील शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, महादेवांनी नर्मदेला वरदान दिलं होतं, तिच्या पाण्याने जी व्यक्ती आंघोळ करेल ती पवित्र होईल, तिचे सर्व पाप नष्ट होतील. म्हणून नर्मदा नदीला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
किंग कोब्रापेक्षाही विषारी प्राणी! चावताच होतो मृत्यू, याच्या विषाला औषधही नाही
विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीच्या पाण्यात चांदीच्या नाग-नागिणीची जोडी प्रवाहित करण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष कायमचा नष्ट होतो, अशी मान्यता आहे. दरम्यान, आपण गंगा नदीची ज्याप्रमाणे मनोभावे पूजा करतो, त्याचप्रमाणे नर्मदा जयंतीदिनी या नदीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.
कुठे करावी पूजा?
ज्योतिषी पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या घराजवळ नर्मदा नदी असेल तर उत्तम. तुम्ही या नदीकिनारी पूजा करू शकता. जर नर्मदा नसेल तर तुम्ही घराजवळील इतर पवित्र नदीच्या किनारीदेखील पूजा करू शकता. तुमच्या घराजवळ एकही नदी नसल्यास तुम्ही घरातही पूजा करू शकता.
अशी करा पूजा
पहाटे सूर्योदयापूर्वी आंघोळ करा. शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात नर्मदेचं किंवा गंगेचं पाणी मिसळा. आंघोळीनंतर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. आता समोर लाकडाची चौकट ठेवा. तिच्यावर नर्मदेचं किंवा गंगेचं पाणी शिंपडा. चौकट व्यवस्थित साफ करा आणि तिच्यावर पांढऱ्या रंगाचं कापड अंथरा. आता त्यावर नर्मदा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. देवीला पांढरी फुलं अर्पण करा. फळं, मिठाई आणि पिठाच्या हलव्याचं नैवेद्य देवीला दाखवा. आता गायीच्या दूधापासून बनवलेल्या शुद्ध तूपाचा दिवा लावा. त्यानंतर देवीची विधीवत पूजा करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा