किंग कोब्रापेक्षाही विषारी प्राणी! चावताच होतो मृत्यू, याच्या विषाला औषधही नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
किंग कोब्राच्या विषाचा एक थेंब 100 लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे. पण हा प्राणी ज्याच्या विषात 100 पेक्षा जास्त विषांचं मिश्रण असतं. ज्यामुळे ते किंग कोब्राच्या विषापेक्षा अधिक शक्तिशाली बनतं.
नवी दिल्ली : जर तुम्हाला जगातील सर्वात विषारी प्राणी कोणता असं विचारलं तर कदाचित तुम्ही साप म्हणाल. अनेक जण किंग कोब्राचं नाव घेतील. तर सापांबाबत अधिक माहिती असलेले सॉ-स्केल्ड वाइपर, इनलँड तैपन या सापांचीही नावं घेतील. तर कुणी जेलीफिश म्हणेल. पण एक असा प्राणी आहे जो या सर्वांपेक्षा जास्त विषारी आहे. या प्राण्याचा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होतो आहे.
किंग कोब्रा ज्याच्या विषाचा एक थेंब 100 लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे. पण हा प्राणी ज्याच्या विषात 100 पेक्षा जास्त विषांचं मिश्रण असतं. ज्यामुळे ते किंग कोब्राच्या विषापेक्षा अधिक शक्तिशाली बनतं.
हाऊ स्टफ वर्क्स वेबसाइटच्या अहवालानुसार, प्राणी धोकादायक आहे की नाही याचं मूल्यांकन करण्यासाठी अनेक निकष आहेत. एकतर ते अत्यंत विषारी असतात किंवा त्यांच्यात विषाणूंसारखे अनेक रोग पसरवण्याची शक्ती असते. याच कारणामुळे काही लोक किंग कोब्राला विषारी मानतात तर काही लोक विंचूला विषारी मानतात. पण या अहवालानुसार, जगातील सर्वात विषारी प्राणी म्हणजे गोगलगाय.
advertisement
आता ही तुम्ही आम्ही नेहमी पाहत असलेली साधी गोगलगाय नाही. तर जिओग्राफी कोन स्नेल आहे, ज्याला कोनस जिओग्राफसदेखील म्हणतात. जी समुद्रात असते. सामान्यपणे ती इंडो-पॅसिफिकच्या खडकांमध्ये राहतो आणि लहान माशांची शिकार करते. या गोगलगायींमुळे आतापर्यंत 40 पाणबुड्यांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, ही गोगलगाय चावल्यानंतर लोकांना वेळेवर रुग्णालयात नेलं नाही तर 65 टक्के लोकांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे त्याच्या विषाचा प्रसार ताबडतोब संपवण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतंही औषध नाही.
तिची शिकारीची पद्धत पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे.
advertisement
the geography cone snail (weird name?) is one of the most poisonous animals on the planet pic.twitter.com/yevCjQbbIK
— Drew Pierson (@drewpiers0n) October 6, 2021
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हा प्राणी किती खतरनाक वाटतो ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
January 18, 2024 5:26 PM IST