उज्जैन, 22 सप्टेंबर : बाप्पा येणार, बाप्पा येणार म्हणता म्हणता मोठ्या धुमधडाक्यात गणरायाचं आगमन झालं. मनोभावे त्याचं स्वागत करण्यात आलं. दीड दिवसांच्या बाप्पाला भाविकांनी भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. तर, अनेक घरांमध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये अद्यापही बाप्पा विराजमान आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
उज्जैनचे प्रसिद्ध ज्योतिषी अनंत शर्मा यांनी गणेशपूजनासाठी धार्मिक पेहराव करण्याचा सल्ला भाविकांना दिला आहे. पुरुषांनी धोतर आणि डोक्यावर रुमाल बांधावा, तर महिलांनी साडी नेसावी, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे गणेशपूजनासाठी पिवळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
advertisement
चक्क सोन्या-चांदीच्या मोदकाचा बाप्पाला नैवेद्य!
लाल रंग हा ऊर्जा, सूर्य आणि मंगळाचा प्रतीक असतो, हिरवा रंग प्रतीकतेचा प्रतीक असतो आणि पिवळा रंग सौभाग्याचा प्रतीक असतो, त्यामुळे या रंगांचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास घरात सुख, समृद्धी नांदते, असं ज्योतिषी म्हणाले.
यंदा पाहिलेच पाहिजेत असे मुंबईतील टॉप 10 गणपती, Photo पाहून तुम्हीच ठरवा कुणाची थीम भारी
ज्योतिषांनी बाप्पाला नैवेद्य काय दाखवावा याबाबतही माहिती दिली. त्यानुसार, 'गजाननाला दुर्वा सर्वाधिक प्रिय असतो, त्यामुळे त्याला दुर्वा आठवणीने अर्पण करावा. मोदक बाप्पाला किती आवडतो, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे त्याला मोदक आणि सोबत लाडूचं नैवेद्य दाखवावं. शिवाय गणेशपूजनात कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व असतं', असं ज्योतिषांनी सांगितलं.