यंदा पाहिलेच पाहिजेत असे मुंबईतील टॉप 10 गणपती, Photo पाहून तुम्हीच ठरवा कुणाची थीम भारी

Last Updated:
मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या गणेशोत्सवात मुंबईतील कोणते 10 गणपती तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत जाणून घ्या.
1/11
 आनंद, उत्साह आणि जल्लोषाचं प्रतिक असलेला सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरूवात झाली आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे.  प्रसिद्ध देखावे पाहण्यासाठी भाविक ही दहा दिवस शहरात मोठी गर्दी करत असतात. या गणेशोत्सवात मुंबईतील कोणते 10 गणपती तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत जाणून घ्या.
आनंद, उत्साह आणि जल्लोषाचं प्रतिक असलेला सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरूवात झाली आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईतील प्रसिद्ध देखावे पाहण्यासाठी भाविक ही दहा दिवस शहरात मोठी गर्दी करत असतात. या गणेशोत्सवात मुंबईतील कोणते 10 गणपती तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत जाणून घ्या.
advertisement
2/11
लालबागचा राजा : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. गणेशोत्सवातील सर्व दिवस या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी असते. यंदा लालबागच्या राजा मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर केला आहे.

3/11
 गणेशगल्ली : लालबागच्या राजापासून जवळच मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीमध्ये मुंबईचा राजा गणपती आहे. आपल्या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांसाठी हे मंडळ ओळखले जाते. हे मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना 1928 साली झाली असून, यावर्षी मंडळाचे 96 वे वर्ष आहे. नवीन कलाकृती म्हणून 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडची प्रतिकृती मंडळाने साकारली आहे.

4/11
 तेजुकाया सार्वजनिक गणेशमंडळ : लालबागचा राजा, गणेश गल्लीतील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त तेजुकाया मेन्शनमधील गणपतीच्या दर्शनासाठी जातात. तेजुकायाची आकर्षक मूर्ती, आजूबाजूचा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. हत्तीसारखे गंडस्थळ, सुपाएवढे कान व लंबोदर, अशी 21 फूट उंचीची गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.

5/11
 चिंचपोकळीचा चिंतामणी : चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती आपल्या भव्य-दिव्य आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण- लालबागचा राजा, तेजुकाया आणि गणेश गल्लीतील गणेशमूर्ती जागेवरच तयार होते. मात्र चिंचपोकळीच्या चिंतामणीचे अगदी वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात आगमन होते. चिंचपोकळीचा चिंतामणी मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. लोभस मूर्तीमुळे हा गणपती अधिकच आकर्षक वाटतो. या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठीही देशभरातून भक्त येत असतात.

6/11
 परळचा राजा : परळचा राजा हा मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. या गणपतीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा या नावाने ओळखले जाते. उंच आणि भव्य गणेशमूर्ती हे परळच्य राजाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे दरवर्षी अगदी वाजत-गाजत थाटामाटात या गणपतीचा आगमन सोहळा पार पडतो. या राजाची आगळीवेगळी आणि सर्वांत उंच मूर्ती दरवर्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. त्यामुळे भाविक दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठीही रांगा लावतात.

7/11
 गिरगावचा राजा : शाडूच्या मातीपासून बनवलेली 16 फुटांची गणेशमूर्ती हे गिरगावच्या राजाचे वैशिष्ट्य आहे. शाडूच्या मातीपासून बनवली जाणारी मुंबईतील ही एकमेव भव्य मूर्ती असेल, असे म्हणायला हरकत नाही. बाप्पाचा लांबसडक लोभस चेहरा हेही या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य असते. आजही अगदी पारंपरिक पद्धतीने या गणपतीच्या आजूबाजूला सजावट केली जाते. स्वातंत्र्यकाळाच्या आधीपासून या गणरायाची स्थापना होत आहे. अनेक सामाजिक उपक्रमही या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात.

8/11
 केशवजी नाईक चाळ : मुंबईतील सर्वांत पहिला सार्वजनिक गणपती आणि मानाचा गणपती म्हणून केशवजी नाईक चाळीतील गणपती ओळखला जातो. या वर्षीचे त्यांचे 131 वे वर्ष आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आणि लहान गणेशमूर्तींसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणपती आहे. गणपतीच्या मूर्तीला पालखीत बसवून अगदी पारंपरिक पद्धतीने आगमन आणि विसर्जन सोहळा पार पडतो. त्यामुळे मुंबईतील मराठमोळी पारंपरिक पद्धत टिकवून ठेवणाऱ्या या मंडळाचा गणपती पाहण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात.

9/11
अंधेरीचा राजा : उपनगरातील प्रसिद्ध गणपती म्हणून अंधेरीच्या राजाची ओळख आहे. दरवर्षी सिंहासनस्थ विराजमान, अशी या राजाची मूर्ती असते. या राजाचे वैशिष्ट म्हणजे तुम्हाला 21 दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थीपर्यंत येथे दर्शनासाठी जाता येते. दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर या गणपतीची सजावट केली जाते. मुंबई आणि राज्यभरातील भाविक या राजाच्या दर्शनसाठी येत असतात.

10/11
 उमरखाडीचा राजा : 1948 साली स्वातंत्र्यसेनानी कै. बाळू चांगू पाटील यांनी मुंबईतील उमरखाडी परिसरात ‘उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळा’ ची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या आदेशाला मान देत बाळू चांगू पाटील यांनी उमरखाडीचा राजाची स्थापना केली.

11/11
जीएसबीचा गणपती : मुंबईमध्ये सर्वात श्रीमंत अशी ओळख मिरवणार्‍या जीएसबी मंडळ किंग्स सर्कलचा यंदाचा गणपती मंडपामध्ये विराजमान झाला आहे. 69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीने यंदा गणरायाला सजवण्यात आलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement