वाराणसी : मंदिर म्हटलं की, तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? अर्थात देव. परंतु मंदिरात देवाचा प्रसादही असतो आणि त्याच्या सेवेसाठी पुजारीही असतात. शिवाय मंदिरात पूजा आणि घंटानाददेखील होतो. मंदिरात घंटा नेमकी का असते, याचा कधी तुम्ही बारकाईने विचार केलाय का? कधीतरी हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, आज आपण त्याचं उत्तर जाणून घेऊया.
advertisement
फार कमी लोकांना माहित असेल की, मंदिरात केवळ प्रसन्न वाटावं यासाठी घंटा नसते. तर तिला धार्मिक शास्त्रात विशेष महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये घंटा वाजवण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी संजय उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकवेळी घंटा वाजवण्यापूर्वी देवी-देवतांचं स्मरण केलं जातं. त्यानंतर पूजा होते आणि मग घंटा वाजवली जाते. मान्यतेनुसार, देवतांचं आगमन आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी घंटानाद केला जातो.
#RamAyenge : राम मंदिरामध्ये दर्शन कसं मिळणार, काय आहे आरतीची वेळ, संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर..
वाईट प्रवृत्तींचाही होतो नाश
घंटानादामुळे आपल्या भोवती देवतांचा वास निर्माण होतो. आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. घंटेचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत देवतांचा वास असतो, असं मानलं जातं. म्हणूनच घंटेसह शंखनादही केला जातो. केवळ मंदिरातच नाही, तर घराघरातील देव्हाऱ्यात घंटा आणि शंख असतंं.
दुकानाबाहेर लिंबू-मिरची का लटकवतात? हे आहे यामागचे महत्त्वाचे कारण...
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, घंटानाद करताना 'आग्मार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसम् ।घण्टारवं करोम्यादौ देवताह्वान् लञ्चनम् ॥' या मंत्राचा जप करावा. त्यामुळे आयुष्यातली नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होते आणि जगण्यात सुख, शांती, समृद्धी येते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g