जीवनात दु:ख का येतात?
वास्तविक, प्रेमानंद महाराज यांच्या सत्संगामध्ये एका भक्ताने प्रश्न विचारला की, जीवनात दुःख का येतात. यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, "सुख आणि दुःख हे मानवी जीवनाचा एक भाग आहेत. त्यामुळे कधी आपल्याला जीवनात सुख मिळेल तर कधी दुःखाचा सामना करावा लागेल."
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की, "सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. ते दोन्ही बदलत राहतील. त्यामुळे आपल्याला दुःख का मिळत आहे, याबद्दल कधीही निराश होऊ नये." यानंतर महाराजांनी दुःख आपल्या जीवनात का येतात हेही सांगितले.
advertisement
जीवनात दुःख येण्याचे कारण काय?
याचं कारण स्पष्ट करताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, "आपले अज्ञान आपल्याला नष्ट करत आहे आणि आपल्याला ताण आणि नैराश्य देत आहे. हे अज्ञान आपल्याला दुःख देते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या दुःखातून मुक्ती मिळवायची असेल, तर देवाची स्तुती करा आणि त्याचे नामस्मरण करा. याने अज्ञानाचा नाश होतो." महाराज म्हणतात की, "जर तुम्ही देवाचे नामस्मरण केले नाही, तर तुम्हाला आयुष्यभर दुःखांचा सामना करावा लागेल."
हे ही वाचा : छोटासा रुद्राक्षही जीवनात आणेल सुख-शांती, पण कोणता रुद्राक्ष घालणं योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून...
हे ही वाचा : Horoscope: या क्षणांची कधीपासून वाट पाहिली! आठवड्यात या राशींच्या वाट्याला आनंदी-आनंद
