विवाह न होण्यामागचे मुख्य कारण: शुक्र ग्रहाचा अस्त
ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहासाठी 'गुरु' आणि 'शुक्र' या दोन ग्रहांचे 'उदय' असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. शुक्र हा वैवाहिक सुख, प्रेम, रोमान्स आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. जर शुक्र ग्रह आकाशात लुप्त किंवा 'अस्त' असेल, तर त्या काळात केलेले विवाह यशस्वी होत नाहीत किंवा वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतात, अशी मान्यता आहे. 2026 च्या सुरुवातीलाच शुक्र ग्रह अस्त अवस्थेत आहे. शुक्र डिसेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात अस्त झाला असून तो 1 फेब्रुवारी 2026 रोजी उदय होणार आहे. 23 जानेवारीला वसंत पंचमी असताना शुक्र अस्त असल्याने, जरी हा दिवस 'अबूझ मुहूर्त' असला तरी विवाहासाठी तो वर्ज्य मानला जात आहे.
advertisement
वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम
शास्त्रानुसार, शुक्राच्या अस्त काळात विवाह केल्यास पती-पत्नीमध्ये सामंजस्याचा अभाव, आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक ओढताण जाणवू शकते. म्हणूनच ज्योतिषी या काळात विवाहाचा सल्ला देत नाहीत.
विवाहित जोडपे वसंत पंचमीला या गोष्टी करू शकतात
यावर्षी वसंत पंचमीला लग्न नसले तरी, ज्यांचे आधीच लग्न झाले आहे त्यांनी योग्य विधींनी देवी सरस्वतीची पूजा करावी. या दिवशी घरी देवी सरस्वतीची पूजा केल्याने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि शुभ फळे मिळतात. पिवळी फुले आणून देवी सरस्वतीला अर्पण करा. पिवळ्या अन्नपदार्थ आणि पिवळे कपडे दान करणे देखील शुभ मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
