या 4 राशी आहेत लाजाळू, गूढ स्वभावामुळे प्रेम व्यक्त करायला घेतात प्रचंड वेळ
असे मानले जाते की शिवलिंगावर बेलपत्रासोबत शमीची पाने अर्पण केल्यास शुभ फळ मिळते. एवढेच नाही, तर जीवनात अनेक सकारात्मक परिणामही होतात.
शिवलिंगावर शमीची पाने योग्य प्रकारे अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवलिंगावर शमीच्या झाडाची पाने अर्पण करण्याचे महत्त्व जाणून घेऊया.
advertisement
शिवपुराणानुसार शमी वनस्पतीच्या पानांचा शिवपूजेत समावेश केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
शमीच्या झाडाला शनीची वनस्पती देखील मानले जाते . शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्यास शिवजींसह शनिदेवाचीही कृपा होईल. शमीचे झाड घरासाठी खूप शुभ मानले जाते.
शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शिवलिंगावर अभिषेक करा.
यानंतर शिवलिंगावर शमीची पाने, बिल्वपत्र, धतुरा, फुले इत्यादी अर्पण करा. पांढरे वस्त्र, जाणवे, तांदूळ, शमीची पाने अर्पण करा.
शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की पूजेसाठी नेहमी ताजी पानेच वापरावीत.
महादेवाला का प्रिय आहेत शमीची पाने?
असे मानले जाते की शमीची पाने आणि फुले भगवान शंकराला विशेष प्रिय आहेत. शिवपूजेत शमीचा नैवेद्य दाखवावा.
या मंदिरात देव रडत असल्याची आख्यायिका, अशाच 6 मंदिरांतील आश्चर्ये आहेत गूढ
ज्योतिषशास्त्रात शमीच्या पानांचे महत्व
ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रहांचा उल्लेख करण्यात आला असून या नऊ ग्रहांच्या शांतीसाठी वृक्ष-वनस्पतींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी.
शिवपुराणानुसार शमीच्या पानांचे विशेष महत्त्व आहे. हे झाड पूजनीय आणि पवित्र असून ते शनिदेवाच्या सर्व दोषांपासून मुक्ती देते. यासोबतच शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने सौभाग्याची इच्छा पूर्ण होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)