TRENDING:

मध्यरात्रीपासून सुरू होणार पंचक, 'या' काळात कोणाचा मृत्यू झाला तर अशुभ का मानलं जातं? नेमकं शास्त्र काय सांगतं?

Last Updated:

हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये 'पंचक' हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्रीनंतर म्हणजेच 21 जानेवारी 2026 च्या पहाटे 1 वाजून 35 मिनिटांनी पंचकाला सुरुवात होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
What Is Panchak : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये 'पंचक' हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्रीनंतर म्हणजेच 21 जानेवारी 2026 च्या पहाटे 1 वाजून 35 मिनिटांनी पंचकाला सुरुवात होत आहे. हा काळ 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीतून भ्रमण करतो आणि धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांमधून जातो, तेव्हा त्या कालावधीला 'पंचक' असे म्हणतात.
News18
News18
advertisement

पंचक काळात मृत्यू झाल्यास काय काळजी घ्यावी?

गरुड पुराण आणि ज्योतिषशास्त्रात पंचक काळात झालेला मृत्यू अत्यंत अशुभ मानला जातो. अशी मान्यता आहे की, या काळात कोणाचा मृत्यू झाला तर कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये आणखी पाच मृत्यू होण्याची भीती असते. पंचकादरम्यान कोणाचा मृत्यू झाला तर शक्य असल्यास पंचक संपल्यावर अंत्यसंस्कार करावेत. पंचकमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने त्या कुटुंबातील आणखी पाच जणांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जाते. या दोषाला 'पंचक दोष' म्हणतात. जर कोणाचा या काळात मृत्यू झाला, तर काही खास खबरदारी घेणे अनिवार्य आहे.

advertisement

1. पुत्तल विधी: अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या शवाशेजारी कुश किंवा पिठाचे पाच लहान पुतळे ठेवावेत. या पुतळ्यांची देखील मृतदेहाप्रमाणेच विधीवत पूजा करावी.

2. एकत्र दहन: अग्नी देताना त्या पाच पुतळ्यांनाही मृतदेहासोबतच मुखाग्नी द्यावा. असे केल्याने पंचक दोष समाप्त होतो आणि कुटुंबावरील संकट टळते, असे मानले जाते.

3. पंचक शांती विधी: अंत्यविधीनंतर एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून 'पंचक शांती' करून घ्यावी. यामुळे मृतात्म्याला सद्गती मिळते आणि वारसांना होणारा त्रास कमी होतो.

advertisement

4. दक्षिण दिशा टाळा: पंचक सुरू असताना मृतदेह बाहेर काढताना किंवा अंत्ययात्रेच्या वेळी दक्षिण दिशेबाबतचे नियम कडकपणे पाळावेत.

5. दानधर्म: गरुड पुराणानुसार, मृताच्या नावाने या काळात अन्न, वस्त्र आणि तिळाचे दान केल्याने दोषाची तीव्रता कमी होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
मध्यरात्रीपासून सुरू होणार पंचक, 'या' काळात कोणाचा मृत्यू झाला तर अशुभ का मानलं जातं? नेमकं शास्त्र काय सांगतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल