मुजफ्फरपुर : भरपूर लोकं कायम कष्ट करतात. मात्र, तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही, असे दिसून येते. या दरम्यान, चांगली कामंही खराब होतात. जीवनात अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही कामात नशीब साथ देत नाही. व्यवसायाच्या क्षेत्रातसुद्धा खूप मेहनत करूनही हवे तसे फळ मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रात नुकसान सहन करावे लागते आणि अशा स्थितीमुळे याचा सर्व परिणाम हा जीवनाच्या इतर क्षेत्रांवरही विपरीत होतो.
advertisement
कुटुंबामध्ये सामंजस्य होत नाही. मतभेद होतात. व्यक्तीचा स्वभाव रागीट होतो. नशिब साथ देत नसल्याने असे सर्व होते. त्यामुळे जर तुमच्यासोबतही असंच काही होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ज्योतिषींनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुमचे नशिब बदलू शकते.
पती बीटेक, तर पत्नी एमबीए, नोकरी करता-करता क्यूट कपलनं सुरू केलं स्टार्टअप, नावही यूनिक
ज्योतिष सल्लागार आलोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कोणतीही व्यक्ती प्रचंड मेहनत करते आणि आपले सर्वोत्तम देते. मात्र, तरीसुद्धा त्याला यश मिळत नाही. म्हणून तो खूप अस्वस्थ होतो. त्याला खूप राग येतो. हे सर्व राहू आणि मंगळ ग्रहामुळे घडते किंवा अनेक वेळा पितृदोषामुळेही घडते. मात्र, यासाठी तुम्ही दोन उपाय करायला हवेत. हे दोन्ही उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
narendra modi : लवकरच होणार भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्ण, बड्या ज्योतिषाची भविष्यवाणी
हे काम केल्याने होईल फायदा -
जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही तुला दान करा. याचा अर्थ तुमच्या वजनानुसार गरिबांना अन्नदान करा. पण जर तुमची क्षमता नसेल आणि तेवढे पैसे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मंदिराची सेवा करू शकता. तुम्ही दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊ शकता. तसेच जर गंगा नदी तुमच्या घरापासून दूर असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही नदीच्या काठी जाऊन स्नान करू शकता. असे केल्याने तुमचे आयुष्य सुधारत आहे, तुमच्या आयुष्यात चांगला बदल होत आहे, असे तुम्हाला दिसेल.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.