युवराज सिंगचा सल्ला
अभिषेक शर्माने यावेळी युवराज सिंगचा सल्ला लक्षात ठेवला. अभिषेक शर्माच्या यशामागे युवराज सिंह यांचा मोठा हात असून, त्यांनी दिलेल्या 'प्रोसेस'वर लक्ष देण्याच्या सल्ल्याचा त्याला मोठा फायदा झाला, असं सांगितलं. केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केल्यास संघात स्थान मिळवणं कठीण जात नाही, असंही अभिषेक शर्मा म्हणतो. भविष्यातील मोठ्या प्लॅनचा विचार करण्यापेक्षा सध्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं अभिषेक शर्मा म्हणाला आहे. त्यावेळी त्याने बोलता बोलता हिंट दिली.
advertisement
मला तिन्ही फॉरमॅट खेळायचं - अभिषेक शर्मा
माझं शेवटचं लक्ष आहे की, टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळायचं. मला टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट आणि वनडे क्रिकेट देखील खेळायचं आहे. मी फक्त माझ्या प्रदर्शनावर लक्ष देतो आणि ज्या गोष्टी माझ्या हातात नाही, त्या गोष्टींची चिंता मी करत नाही, असं अभिषेक शर्माने मनमोकळ्यापणे सांगितलं. भविष्यातील मोठ्या प्लॅनचा विचार करण्यापेक्षा सध्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणं हेच एक ध्येय आहे, असंही अभिषेक शर्माने म्हटलं आहे.
अभिषेक आणि टेस्ट विचित्र समीकरण
दरम्यान, अभिषेक शर्मा आणि टेस्ट क्रिकेट हे विचित्र समीकरण जरी वाटत असलं तरी देखील अभिषेकला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना पाहणं रोमांचक असणार आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या स्कॉडमध्ये अभिषेकला संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वालला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची चर्चा देखील सुरू झालीये.
